बीड
पेटंटमुळे समाजाला तंत्रज्ञान व उत्पादनाची उपलब्धी होते.-प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे

पेटंटमुळे समाजाला तंत्रज्ञान व उत्पादनाची उपलब्धी होते.-प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे
प्रतिनिधी गढी – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथील गृहशास्र विभागाच्या प्रा.डॉ अयोध्या पवळ यांना पेटंट मिळाल्याबद्दल महाविद्यालयातील संशोधन कार्यक्रम योजना व विकास समितीच्या वतीने त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे शुभेच्छापर बोलत असताना त्यानी असे प्रतिपादन केले, की पेटंट शोधकर्त्यांना त्यांच्या शोधांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांना फायदा देतात..पेटंटमुळे या शोधांबद्दलची तांत्रिक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देऊन आणि अशा प्रकारे नवोपक्रमाला गती देऊन समाजालाही फायदा होतो.समाजाला यामुळे नवीन तंत्रज्ञान व उत्पादन यांची उपलब्धी प्राप्त होते.प्रा.डॉ. अयोध्या पवळ यांना मिळालेल्या पेटंटमुळे महाविद्यालयाच्या संशोधन क्षेत्रातील योगदानात निश्चितच भर पडली आहे.यावेळी प्रा. डॉ. अयोध्या पवळ यांनी आपल्या मनोगतातून आपली भूमिका विशद केली. प्रा.डॉ. अयोध्या पवळ यांच्यासह प्रा. डॉ. चेतना डोंगलीकर, प्रा. डॉ. उषा माने व प्रा. डॉ. रोहिणी अंकुश यांना संयुक्तारित्या “Compositions and Methods for an Immunity: Boosting Spice Powder’ या विषयावरील संशोधनासाठी शासनाचे पेटंट मिळाले आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांनी त्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ धर्मराज कटके, सूत्रसंचालन प्रा. डॉ राणी जाधव व आभारप्रदर्शन प्रा. हिरा पोटकुले यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्रध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



