बीड
जलतरण स्पर्धेतही गेवराईचे विद्यार्थी खेळाडूं झळकतील–रणवीर पंडित

जलतरण स्पर्धेतही गेवराईचे विद्यार्थी खेळाडूं झळकतील–रणवीर पंडित
जलतरण स्पर्धेने क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ
===============
गेवराई दि.२७ (प्रतिनिधी) गेवराई तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाडूंना क्रिडा क्षेत्रात करिअर करता यावे म्हणून जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत क्रीडा महोत्सवाचे गेल्या तीन वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर गेले असून या वर्षी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जलतरण स्पर्धेतही एक दिवस गेवराई तालुक्यातील खेळाडू देश पातळीवर खेळेल आणि या तालुक्याचा नाव लौकिक होईल असे प्रतिपादन शारदा स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष रणवीर अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था अंतर्गत चौथ्या क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी जलतरण स्पर्धेत विजेत्या जलतरण स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था अंतर्गत चौथ्या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ जलतरण स्पर्धेने झाला. गेवराई येथील नगर परिषदेच्या जलतरण तलाव येथे शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, गेवराई वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमित मुळे, डॉक्टर्स असोसिएशन गेवराईचे अध्यक्ष
डॉ. अशोक काळे, ॲड, प्रदीप मडके, सामाजिक कार्यकर्ते महादेव बेंद्रे, संजय भालशंकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारेल—डॉ. अशोक काळे
===============
यावेळी बोलताना डॉ. अशोक काळे म्हणाले की,अलीकडच्या काळात विद्यार्थी मैदानापासून दुर जात आहेत अशा परिस्थिती रणवीर पंडित यांनी विद्यार्थ्यांना मैदानाकडे वळवले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारेल. यातूनच क्रिडा क्षेत्रात जाण्यासाठी संधी निर्माण होणार आहे. रणवीर पंडित यांनी केलेली पेरणी उत्तम असून येणाऱ्या काळात क्रीडा क्षेत्रात गेवराईचे विद्यार्थी पुढे येतील असेही ते म्हणाले.
प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलतरण तलावाचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला. २५ मिटर, ५० मिटर साठी प्राथमिक व माध्यमिक गटात मुले आणि मुलींच्या स्पर्धेत संस्थेच्या १८ शाळेचे १४४ स्पर्धक सहभागी झाले होते. जलतरण स्पर्धेतील २५ मिटरमध्ये मुलींच्या प्राथमिक गटात जयभवानी विद्यालय गुढीची कु. अटपळे आरती, शिव शारदा पब्लिक स्कूल ची कु. सानप आर्या द्वितीय तर माध्यमिक विद्यालय रामपुरीची कु. अंकिता बळी हीने पटकावला तर ५० मिटर मध्ये मुलींच्या माध्यमिक गटात माध्यमिक विद्यालय रामपुरीची कु. प्रतिक्षा बळी हीने प्रथम, माध्यमिक विद्यालय उमापुरची कु. तेजस्विनी औटी हीने द्वितीय तर तृतीय क्रमांक शिवशारदा पब्लिक स्कूलच्या कु. शितल कोकाट हीने पटकावला. ५० मिटर मध्ये मुलांच्या प्राथमिक गटात शारदा विद्यामंदिर दैठणच्या आकुश आदित्य याने प्रथम तर द्वितीय क्रमांक शारदा विद्यामंदिर बीडच्या सुरज तौर यांने तर तृतीय क्रमांक शिव शारदा पब्लिक स्कूलच्या अभिषेक कोकाट यांने पटकावला. २५ मिटर मध्ये मुलांच्या माध्यमिक गटात शिवशारदा पब्लिक स्कूलच्या स्वराज गायकवाड यांने प्रथम तर माध्यमिक विद्यालय तलवाडाच्या विश्वास लाड याने द्वितीय तर तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय राक्षसभुवनच्या तुषार नाटकर याने पटकावला. ५० मिटर मध्ये मुलांच्या माध्यमिक गटात शिवशारदा पब्लिक स्कूलच्या स्वराज गायकवाड याने प्रथम तर द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय तलवाडाच्या विश्वजीत कांबळे याने तर तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय धोंड राईच्या रोशन जाधव याने पटकावला. स्पर्धेचे पंच म्हणून डॉ. केतन गायकवाड, धस दिलीप, गायकवाड नितीन, उनवणे नवनाथ, घारगे पांडुरंग, ठाकूर विशाल धापसे ज्ञानेश्वर, अपसिंगेकर विजयकुमार, नवले गणेश यांनी काम पाहिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी केले. यावेळी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहप्रशासन अधिकारी प्रा. गोगुले, मुख्याध्यापक तथा प्राचार्य मुरलीधर पवार, अशोक तौर, भक्तराज पौळ, वसंत राठोड, रणजीत सानप, सय्यद युनुस, भागवत राऊत, विश्वनाथ पवार, अंकुश राठोड, लक्ष्मण काळे, शिवाजी पाटोळे, अरुण हाटकर, उदय पाठक, दत्तात्रय देशपांडे माजी मुख्याध्यापक राजेंद्र काळे, कैलास गायकवाड यांच्यासह शिक्षण संस्थेतील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.



