बीड

चिंचाळा ते देसूर रस्त्यावर डांबराचे प्रमाण अत्यल्प; खडी उघडी असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे

चिंचाळा ते देसूर रस्त्यावर डांबराचे प्रमाण अत्यल्प; खडी उघडी असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे

आष्टी प्रतिनिधी:-चिंचाळा ते देसूर या रस्त्यावर डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्याने या रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. या मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतुक चालु असते. त्यामुळे वाहनचालकांना आपली वाहाने चालवताना शारिरीक त्रासाला समोरे जावे लागत आहे.

या रस्त्यावरील खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. या मार्गावर अवघड वळणे आहेत. या रस्त्याचा वाहनधारकांना फायदा तर होताना दिसत नाही, परंतु खर्च वाया जात असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. त्यामुळे या रस्त्यावर केलेला सर्व खर्च गंगाजळीच जाताना दिसतो आहे. शेकापूर मार्गे बीडसांगवी येथे

जाण्याचा मार्ग अत्यंत खराब झाल्याने लोक चिचाळा मार्गे बीड सांगवीला जाण्यास पसंती देत आहेत. परंतु यामार्गाचे ही हाल आहेत. या मार्गावचे काम करताना यामध्ये डांबर हे अत्यल्प प्रमाणात वापरल्यामुळे या रस्त्याचा सुद्धा दर्जा ढासाळलेला आहे. किन्ही मार्गे बीडसांगवी कडे जाण्याच्या मार्गाची परिस्थीती काही वेगळी नाही. त्यामुळे तीनही बाजुने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे तालुक्यातील रस्त्यांची एका वर्षात झालेली दुर्दशा दिसत आहे. काही रस्ते पुर्ण होई पर्यंत मागे उखडत आहेत ? या मार्गे जाताना अंगदुखीची गोळीच खाण्याची वेळ वाहन धारकांवर येते. डांबर पुरेसे वापरले जात नसल्याचेही तालुक्यातील जनता बोलत आहे. असी काहीसी परिस्थिती आष्टी तालुक्यातील रस्त्यांची झालेली आहे. यामुळे खड्डे बुजवले तरी त्याला दर्जा असावा, या रस्त्याची कॉलेटी कंट्रोल मार्फत चौकशी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. दोन तीन वर्षात जर रस्त्याला ठिगळे लावण्याची वेळ येत असेल तर तालुक्यात किती दर्जेदार रस्त्यांची कामे झाली आहेत हे यावरून दिसून येत आहे. या विभागाचे साहेब बीडलाही तेच आहेत आणि आष्टीलाही तेच आहेत. ते फोन घेत नसल्याने त्यांचे म्हणणे घेता आहे नाही. रस्ता केला तरी त्याला दर्जा असावा. असे जनतेतून बोलले जात आहे.

Back to top button