बीड

वसंतदादा पाटील महाविद्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

वसंतदादा पाटील महाविद्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

पाटोदा दि. ८ डिसेंबर रोजी येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.)चे  वसंतदादा पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख, प्रमुख व्याख्याते म्हणून कार्यालयीन अधीक्षक श्री. अशोक पवार, तर उपप्राचार्य डॉ. सतीश माउलगे उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण आणि पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या  हस्ते संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा छोटासा सत्कार समारंभ राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असतांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे यांनी संत जगनाडे महाराजांच्या कार्याचा ओघवता आढावा घेतला. त्यानंतर   महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री अशोक पवार यांनी संत जगनाडे महाराजांच्या जीवन व कार्याची माहिती विषद केली. आपल्या व्याख्यानात त्यांनी, ” जगनाडे महाराजांचे कार्य समाज उद्धाराचे होते, आजच्या विस्कळीत समाज जीवनास सावरण्यासाठी त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे ” असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोपात  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बळीराम राख यांनीही जगनाडे महाराजांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त करून, ” संत जगनाडे महाराज म्हणजे त्याग व भक्तिचे प्रतिक होते. ” असे वक्तव्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. मनिषा गाडवे यांनी, तर उपस्थितांचे  आभार  प्रा. डॉ . न. पू. काळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या  आयोजन व यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. जालिंदर लोणके, प्रा. प्रदीप मांजरे प्रा. डॉ. चंद्रकांत बनसोडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, यांची उपस्थिती होती.

Back to top button