बीड

परळीचा विकास जिंकावा यासाठीच कमळ-घड्याळ एकत्र

परळीचा विकास जिंकावा यासाठीच कमळ-घड्याळ एकत्र

स्वच्छ, सुंदर व निर्भय परळीसाठी महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करा

ना. पंकजाताई मुंडे यांच्या  काॅर्नर सभांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

परळी वैजनाथ।दिनांक २७।:-लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून ते आतापर्यंत परळी शहराच्या जडणघडणीत आणि प्रत्येक विकासावर ‘मुंडे’ हे नाव कोरलेले आहे. इथला विकास जिंकावा यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत, येणाऱ्या काळात आम्ही शहराला विकासाच्या एका उंचीवर नेऊ यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असं आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांनी आज महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी तसेच नगरसेवक पदाचे प्रभाग १० मधील उमेदवार सरोज डावरे, महेश मुंडे, कुसूमबाई चाटे, प्रभाग ६ चे अंजली बनसोडे, व्यंकटेश शिंदे, प्रभाग १६ च्या सारिका हरंगुळे, तकी खान, प्रभाग १४ चे पवन मुंडे आणि पूजा प्रितेश तोतला यांच्या प्रचारार्थ काॅर्नर सभा घेतल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

ना. पंकजाताई बोलताना पुढे म्हणाल्या की, परळी शहर, इथली जनता माझी आहे. आमदार असताना नगरोत्थान योजनेतून ४० कोटीचा निधी आणला होता, त्यातून रस्त्याची कामे केली. पाणी पुरवठा योजना पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न केले. पालकमंत्री असताना खूप विकास करायचा होता पण पालिका ताब्यात नसल्याने शक्य झाले नव्हते. आता संघर्ष करण्यापेक्षा दोघे मिळून शहराच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत, पालिकेच्या माध्यमातून शहराला विकासाच्या एका उंचीवर नेऊ. रस्ते, नाल्या, समाज मंदिर बांधण्याबरोबरच माणसं जोडण्याचे काम देखील आम्ही करणार आहोत यासाठी महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा असं आवाहन त्यांनी केलं.

Back to top button