बीड

ना. अजितदादा पवार यांचे विकासाचे व्हिजन व्यापारी वर्गाला आशेचा किरण दाखवून गेले

ना. अजितदादा पवार यांचे विकासाचे व्हिजन व्यापारी वर्गाला आशेचा किरण दाखवून गेले
================
*राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यापारी बांधवांच्या मेळाव्यात केले महत्वपूर्ण मार्गदर्शन*
================{
बीड दि.२६ (प्रतिनिधी)   राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम आणि मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रेमलता पारवे आणि ५२ नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथे झालेल्या व्यापारी बांधवांच्या मेळाव्यात ना. अजितदादांनी मांडलेले विकासाचे व्हिजन व्यापारी वर्गाला आशेचे किरण दाखवून गेले. नगर परिषदेत गेल्या ३५ वर्षांपासून एकाच कुटूंबाची असलेली मक्तेदारीमुळे बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला खिळ बसली. ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे व्हिजन असलेले पॅनल नगर परिषदेत गेले तर बीड शहरात विकासाची सकाळ उगवेल अशी चर्चा व्यापारी वर्गात चर्चीली जात आहे.
बीड नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे आणि शहरातील ५२ नगरसेवकांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी व्यापारी बांधवांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करून व्यापारी वर्गात ऊर्जा भरली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बीड शहराच्या भविष्याचा निर्णायक टप्पा नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या दारात उभा आहे. या निवडणुकीत लोकविकास महाआघाडीने नगराध्यक्षांसह ५३ उमेदवार उभे केले आहेत. ते अनुभवी आहेत, त्यांच्यात नवी उमेद आहे, ऊर्जा आहे. बीड शहर हे विविध जाती-धर्मांचे मनोमीलन असणारे शहर आहे. या शहराच्या प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे. या भागाचा औद्योगिक विकास झाला पाहिजे ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. CIIIT सारख्या प्रकल्पामुळे विकासाला नवी दिशा मिळत आहे. क्रीडा संकुलासाठी आर्थिक निधीची तरतुद करण्यात आली आहे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. पिंपरीचिंचवड आणि बारामतीत कचरा व्यवस्थापन, आधुनिक प्लांटस्‌‍, चांगले अधिकारी जसे उपलब्ध करून दिले त्याच धर्तीवर बीड शहरात देखील या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. विमानतळासाठीची जागा, सायन्स पार्क, दर्जेदार रस्ते ही कामे सुरु आहेत, बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेला पुण्यापर्यंत आणि त्यानंतर मुंबईपर्यंत न्यायचे आहे. बीड शहराचा कायापालट व्हावा म्हणून पुढची पाच वर्षे पूर्णपणे काम करण्याची संधी मिळणे आम्हाला गरजेचे आहे. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरीक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. बीडकरांना बारा महिने पाणी मिळावे, व्यापारी विविध सुविधा मिळाव्यात, एम.आय.डी.सी. चा विकास गतीने व्हावा, मुलभूत सुविधा दर्जेदार मिळाव्यात यासाठी काम चालू आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन करून ना. अजितदादा पवार यांनी व्यापारी वर्गाला आशेचा किरण दाखवला असून व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान ना. अजितदादा पवार यांच्या प्रचार दौऱ्यामुळे बीड नगर परिषद निवडणुकीत कार्यकर्ते आणि मतदारांध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह ५२ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेले आहे.
Back to top button