बीड

कागदे साहेब, दलित मित्राच्या लेकीवर खऱ्या-खोट्याचा आरोप करण शोभत का?

 कागदे साहेब, दलित मित्राच्या लेकीवर खऱ्या-खोट्याचा आरोप करण शोभत का?
कागदे साहेब, तुम्ही माझे भाऊच; बहिणीवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप का ?
माझ्या जावयाचे बांधव भिमाच्या लेकीला निवडून देण्यासाठी जिवाचे रान करत आहेत
बीड (प्रतिनिधी): तलाठी, मंडळ अधिकारी म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मी सेवा केली आहे. नायब तहसिलदार या पदासह निवृत्त झाले. बीडच्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून निवडणुक लढवत आहे. मात्र गेल्या काही दिवसात निवडणुकीत माड़ो काही बांधव आणि राजकीय विरोधक अत्यंत पातळी सोडून मतांसाठी बोलत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून या लोकशाहीच्या उत्सवात मी सहभागी आहे. मात्र कौटूंबिक पातळीवरचे खोडारडे आरोप करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा दुर्देवी आणि केविलवाणा प्रयत्न माड़ो प्रतिस्पर्धी पक्षाचे लोक करत आहेत.
राष्ट्रवादी
काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम
मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रेमलताताई पारवे वांनी पत्रकारपरिषद घेवुन त्यांच्यावर होत असलेल्या आरोपा संदर्भात भुमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, काल माझ्या मुलाला त्याच्या आजारपणात सोडून गेलेल्या पत्नीने
जो कांगावा केला, तो केवळ राजकीय हेतूने केला आहे. माझ्या मुलांच्या दोन्ही किडण्या फेल झाल्यानंतर पत्नी म्हणून त्याच्या पाठिशी उभे राहण्याचे सोडून सोशल मिडीयामध्ये व्हिडीओ करत फिरत राहणाऱ्या त्या महिलेने माझ्यावर केलेले आरोप विरोधकांचे कटकारस्थान आहे. काल माझ्यावर आरोप करणान्या महिलेला माझा प्रश्न आहे, नवऱ्याच्या दोन्ही किडण्या गेल्यावर तू कुठे होतीस ? मी आई म्हणून स्वतःची किडणी दिली, एक आई म्हणून मी याचं भांडवल करू इच्छित नाही. कौटुंबिक पातळीवर जाऊन एका महिलेल्या विरोधात विरोधकांनी एवढ्या खालच्या पातळीला जाणे दुर्दैवी आहे. माझी विनंती आहे की, निवडणुक ही मुद्यांवर, विकासावर झाली पाहिजे जर ती जात, धर्म आणि कुटूंबावर जाणार असेल तर विरोधकांची ही नैतिक हार आहे.
माझे बंधु पप्पू कागदे यांनी सुरुवातीला एक प्रेस घेतली. राजकारणापासून दूर असणारी बाई आहे मी, लहान असताना बापाचे दलित राजकारण मी बघितलं. माझा बाप मनोहरराव वंजारे या माणसाची ओळख सांगण्याची जिल्ह्याला गरज नाही. भिमाचं नाव घेऊन रुबाबदार आणि स्वाभिमानी राजकारण माझ्या बापानं केले. दलित मित्र म्हणून आंबेडकरी चळवळीत योगदान दिलं. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने मला संधी दिली तर माझे बंधु पप्पू कागदे यांनी खोटं आणि खरं एस.सी. चा वाद समोर आणला. माझा प्रश्न आहे माझ्या भावाला, हो ते माझे भाऊच आहेत. कारण माझ्या वडिलांकडे जेंव्हा पप्पू कागदे यायचे तेंव्हा म्हणायचे की तुमच्या मुलासारखा आहे. जर माझ्या वडिलांच्या मुलासारखे तुम्ही आहात तर तुम्ही माझे भाऊ आहात. माझ्या भावाला विनंती आहे की, निवडणुका येतील आणि जातील, जय-पराजय होत राहतील मात्र एका दलित मित्राच्या लेकीवर खऱ्या खोट्याचे आरोप करता. कागदे साहेब खरं-खोटं काय असतं ? माझा बाप आज जिवंत नाही नाहीतर ‘डीएनए’ केला असता. मी आंबेडकरी चळवळीतील लेक आहे, आंबेडकरी चळवळीची मालकी काय माझ्या एका भावाकडे नाही.
अजून एक कागदे साहेब माझ्या मुलीला रखेल म्हणालात, ठेवलेली म्हणालात. डॉ. बाबासाहे आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे कायद्यात राहून माझ्या मुलीने शेख मुजीब यांच्याशी सनदशीर पध्दतीने विवाह केलेला आहे जो मला मान्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताचा लढा उभा केला आणि कागदे साहेब तुम्ही काय म्हणातायत ? माझ्या मुलीने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जातधर्माच्या भिंती ओलांडून विवाह केला जो तुम्हाला मान्य नाही का ? कसले आंबेडकरवादी आहात तुम्ही ? हा माझा सवाल आहे कागदे साहेब तुम्हाला. आज एका दलित महिलेला राजकारणात आलेलं पाहून तुमच्या पोटात दुखतंय, माझा बाप आणि नवरा दोघेही बौध्दवासी आहेत अशा भिमाच्या लेकीवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही आरोप करणार आहात का ?
हो मुजीब शेख माझा जावई आहे, मी त्याची सासू आहे. लपून छपून नाही तर बाबासाहेबांना स्मरून बाबासाहेबांच्या कायद्याने हे नाते आहे. आज माझ्या जावयाचे बांधव एका भिमाच्या लेकीला निवडून देण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. मी त्यांचे आभारी आहे, मी निवडून आल्यानंतर कागदे साहेब मीच सही करणारेय, मीच खुर्चीत बसणारेय, माझ्या खुर्चीच्या मागे आमच्या बापाचा बाबासाहेबांचा फोटो लागणार आहे. त्यामुळे आंबेडकरवादाची ढाल करून स्वतःचं राजकारण पुढे करू नये. स्वतःचा दडलेला अर्थ आता समाजाच्या लक्षात आलाय.
आणखी एक तुमच्यावर कुठला अन्याय झालाय. आरक्षण महिलेला आहे. तुम्ही कुठे उभे होतात ? तुमचा उमेदवार कोण होता? हे एकदा समाजाला सांगा. केवळ अन्याय म्हणून, छाती बडवून हे पटणारे नाही. एका महिलेवर तिच्या चारित्र्यावर, तिच्या कुटूंबावर आणि तिच्या अनुवंषावर संशय घेणं हे अत्यंत किळसवाणे, क्लेषदायक आणि दुर्दैवी आणि आंबेडकरी चळवळीला न शोभणारे आहे असे प्रेमलताताई पारवे यानी पत्रकारपरिषदेत म्हटले आहे.
चौकट
माझ्यावरील आरोप म्हणजे विरोधकांचे कटकारस्थान
निवडणुक ही मुद्दयावर आणि विकासावर झाली पाहिजे. मात्र ती जात, धर्म आणि कुटुंबावर जाणार असेल तर ही विरोधकांची नैतीक हार आहे असे प्रेमलताताई पारवे यांनी स्पष्ट केले. माझ्या सुनेला पुढे करून ज्या पद्धतीने राजकारण केले जात आहे ते अत्यंत घृणास्पद आहे. विरोधकांनीच तीला पुढे केले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र आत्तापर्यंत ती कधीच मिडीयासमोर आली नाही, जाहिरपणे बोलली नाही, केवळ राजकीय हेतुने प्रेरीत होवुन विरोधकांनी हा माझ्याविरुद्ध डाव रचण्याचा केलेला प्रयत्न आहे. हा सर्व खटाटोप विरोधकांचा असुन त्यांनी अशा पद्धतीचे घृणास्पद राजकारण केले असले तरी जनता माझ्या पाठीशी असल्याचे पारवे यांनी सांगीतले. मी भिमकन्या आहे. चुकीचे कधीच करणार नाही. मी या विषयावर आजपर्यंत काहीच बोलले नाही. मात्र तिने कौटुंबीक बाद चव्हाट्यावर आणला. त्यामुळे आज मला हे बोलावे लागत आहे. मी आतापर्यंत केवळ विकासाच्या मु‌द्यावर बोलत होते. मात्र बिरोधकांनी ही निवडणुक थेट जातीवर आणल्याचा आरोपही पारवे यांनी केला.
Back to top button