संभाजीनगर येथील हंबरडा मोर्चासाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी व शिवसैनिक यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे- परमेश्वर सातपुते
प्रतिनिधी:(बीड)शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत व शिवसेना नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दादा दानवे साहेब यांच्या नियोजनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 11 ऑक्टोबर 2025 शनिवार रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये शासनाने मदत द्यावी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी,ओला दुष्काळ जाहीर करावा,आशा विविध मागण्या संदर्भात भव्य असा हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरील मोर्चा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या व न्याय हक्कासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चामध्ये जास्तीत जास्त शिवसैनिक व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी केले आहे..



