📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

महायुती सरकारने फसवे पॅकेज जाहीर करताना शेतकऱ्यांची थट्टा केली. हंबरडा मोर्चात जाब विचारणार अंबादास दानवे. 

बीड -(प्रतिनिधी) मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे शेती, पिकांचे, अतोनात नुकसान झाले असून त्यांच्यावर आसमानी सुलमानी संकट ओढवले आहे. अशा संकटावेळी तीन पक्षाचे महायुती सरकार गेंड्याची कातडी पांघरून  शांत बसलेले आहे. सत्ताधाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे  या मागण्याकरिता संभाजीनगर येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले. असून या मोर्चात हजारच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान बीड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

            पुढे बोलताना अंबादासजी दानवे यांनी म्हटले की आज मुख्यमंत्र्यांनी फसवे पॅकेज जाहीर करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले ६० लाख शेतकऱ्यांसाठी निकषाच्या पलीकडे जात फक्त ६ हजार कोटी सोडले आहे. ज्यांची जमिनीतील माती खरडून गेली आहे त्यांना हेक्टरी ४७ हजार रुपये व मनरेगा तून ३ लाख रुपये देऊ असे जाहीर केले मनरेगाचे आधीच्याच कामाचे पैसे हे सरकार अजून पर्यंत देऊ शकले नाहीत. या कामाचे कधी पैसे देणार हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार केला तर ही मदत पुरेशी नसून त्यांना तात्काळ मदत ती सोबत कर्जमुक्ती मिळाली पाहिजे.

            एका शेतकऱ्याला शेतात काळ टाकायचा असेल जमिनीची लेवल करायची असेल तर त्यासाठी आधी मनरेगा कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागेल मग कामानुसार मजूर ठरणार मग मजुरांना पैसे देणार हे फक्त मुख्यमंत्र्यांना वेळ काढून धोरण अवलंबिले आहे.

            यावेळी बोलताना संपर्कप्रमुख परशुराम जाधव म्हणाले की मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली पाहिजे या मागणीसाठी स्वतः उद्धव साहेब ठाकरे मैदानात उतरले असून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हंबरडा मोर्चा सहभागी व्हावे. 

यावेळी जिल्हाप्रमुख उल्हास गिराम गणेश वरेकर यांनी मनोगत व्यक्त केले व जास्तीत जास्त संख्येने मोर्चात उपस्थिती लावू असा विश्वास दिला या बैठकीचे सूत्रसंचालन गोरख सिंघन यांनी केले तर आभार प्रदर्शन विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे  यांनी केले.

         या बैठकीस शिवसेना संपर्क प्रमुख परशुराम जाधव, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम, गणेश वरेकर माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे , परमेश्वर सातपुते, शिवसेना प्रवक्ते गणेश जाधव ,जिल्हा संघटक भाई संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख रामराजे साळुंखे आजिनाथ खेडकर ,राजूभाऊ महुवाले, आशिष मस्के ,हनुमान जगताप, जिल्हा संघटक नितीन धांडे महिला संघटक मीराताई नवले प्रमिलाताई माळी,तालुकाप्रमुख अजय दाभाडे सुभाष राऊत मुकुंद शिंदे विनायक मुळे सोपान काका मोरे 

अशोक जाधव श्रीधर गरड भोजराज पालीवाले लक्ष्मण सोळुंके अशोक गाढवे रवि वाघमारे नामदेव सोळंके संजय शिंदे हरिभाऊ खेडेकर राजेश कोकणे उपस्थित होते.

Back to top button