बीड
विराट महामोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित रहा – रोहिदास पवार

विराट महामोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित रहा – रोहिदास पवार
हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाचा तात्काळ का लागू करा,
बीड (प्रतिनिधि)- महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी कुणबी आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेट ईयर चा संदर्भ देऊन शासन निर्णय जाहीर केला आहे. या धर्तीवर बंजारा समाजाला हाच गॅजेट लागू करून शासन निर्णय जाहीर करावा व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करावा. हैदराबाद संस्थांमधील नोंदी पाहून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात मोडतो याच आधारे आंध्रप्रदेश,तेलंगणा या राज्यात बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आरक्षणाचा फायदा घेतोय. या संविधानिक मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा विराट मोर्चा आयोजन करण्यात आला आहे,तरी बंजारा समाज बांधवांनी या विराट महामोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान बंजारा पँथरचे अध्यक्ष रोहिदास पवार यांनी केले आहे.
सन 1728 ते 17 सप्टेंबर 1948 या निजाम शासनकालीत बंजारा समाज आदिवासी म्हणून वास्तव्यात राहत होता आणि हाच निजामशाषनाने बंजारा समाजाला आदिवासी म्हणून घोषित केला होता. निजाम काळातून मराठवाडा स्वातंत्र्य झाला परंतु बंजारा समाजावर खूप मोठा अन्याय झाला अशी खंत बंजारा समाज बांधव वारंवार करत आहोत तरी राज्य शासनाने हैद्राबाद गॅजेट यानुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणात समाविष्ट करावा. 15 सप्टेंबर च्या महामोर्चात बीड जिल्ह्यातील बंजारा समाज लाखोच्या संख्येने उपस्थित राहील अशी माहिती बंजारा पॅंथर चे अध्यक्ष रोहिदास पवार यांनी पत्रकारांना दिली आहे व समाज बांधवांना आवाहन केलेले आहे.


