“गुरुवर्यांचा गौरव – ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत शिक्षक दिन सोहळा”

“गुरुवर्यांचा गौरव – ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत शिक्षक दिन सोहळा”
शिक्षकदिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत सत्कार समारंभ
पुणे/आळंदी:-आळंदी देवाची (ता.खेड) येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आयोजित शिक्षकदिनानिमित्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सेठ कांतीलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाणीभूषण, प्रख्यात कीर्तनकार मा.श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर म. जाधव हे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मा.श्री. सुरेशजी हुलावळे उपस्थित राहणार असून, प्रामुख्याने मा.श्री. नंदकुमारजी सांकुळे हेही उपस्थित राहणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश ध. वडगांवकर, खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर श्री. पाटील, उपाध्यक्ष श्री. विलास गो. कुन्हावडे, सचिव श्री. अनिल सुभाष वडगांवकर, तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व ज्ञानेश्वर विद्यालय-ज्युनिअर कॉलेजतर्फे शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांचे शैक्षणिक योगदान अधोरेखित केले जाणार आहे. शिक्षकदिनानिमित्त होणारा हा सत्कार समारंभ संस्थेच्या वैभवशाली परंपरेला पुढे नेणारा ठरणार आहे.



