गणेशोत्सवाच्या उत्साहात जामखेड महाविद्यालयात क्रीडा व संस्कृतीचा जल्लोष

गणेशोत्सवाच्या उत्साहात जामखेड महाविद्यालयात क्रीडा व संस्कृतीचा जल्लोष
जामखेड : दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड महाविद्यालयामध्ये गणेश उत्सवानिमित्त आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात फुगडी, तीन पायाची शर्यत, संगीत खुर्ची, पथनाट्य, रस्सीखेच, कबड्डी अशा स्पर्धांचे सांस्कृतिक विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पुराणे यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नमाला देशपांडे तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अण्णा मोहिते यांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते. यामुळे गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये विविध शाखांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



