बीड
ईद ए मिलाद निमित्त बालेपीर परिसरात शुक्रवारी रक्तदान शीबीराचे आयोजन

ईद ए मिलाद निमित्त बालेपीर परिसरात शुक्रवारी रक्तदान शीबीराचे आयोजन
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बीड (प्रतिनिधी)- ईद ए मिलादउन नबी निमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटी, बीड जिल्हा निराधार विभाग, व सोनू फॅन्स ग्रुप बीड, समाजसेवक गणेश जवकर व बालेपीर मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.या विषयी अधिक माहिती अशी कीईद ए मिलादउननबी निमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित विभाग, सोनू फॅन्स ग्रूप बीड व बालेपीर मित्र मंडळ च्या वतीने दि .5 सप्टेंबर रोजी शुक्रवार कालिंका नगर समोर कांग्रेस जनसंपर्क कार्यालय अ.नगर रोड बालेपीर ,बीड येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्त दात्यांनी या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय कांग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष निराधार निराश्रित विभाग शेख मोहसीन बुऱ्हानोद्दीन , सोनू फॅन्स ग्रूप चे अध्यक्ष सोनू सेठ बीड,समाजसेवक गणेश जवकर, तालुका अध्यक्ष निराधार विभाग शेख झहीर अमीर , जमील खान सत्तार खान कार्याध्यक्ष व बालेपीर मित्र मंडळ यांनी केले आहे. 9850478313 व 9209777313 व 8999590030 व 9860809508 व 9421442819 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



