बीड

अहिल्यादेवी होळकर आदर्श शासक, स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान : प्रा. राम शिंदे

अहिल्यादेवी होळकर आदर्श शासक, स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान : प्रा. राम शिंदे

चौंडी जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणा व उन्नतीसाठी ३६० कोटींचा निधी

जामखेड प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण भारताच्या जनतेसाठी एक आदर्श शासक, न्यायप्रिय नेतृत्त्व आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनात पारदर्शकता, प्रजेबद्दलची माया आणि समाजातील सर्व घटकांचा विकास या तत्त्वांचा अंगीकार केला. त्यांनी अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, पाणवठे यांचा जीर्णोद्धार व नूतनीकरण केले. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना व यात्रेकरूंना सुविधा मिळाव्यात म्हणून धर्मशाळा व पायाभूत सुविधा उभारल्या. स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी जे कार्य केले, ते आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे, असे मत सभापती प्रा. राम शिंदे व्यक्त केले.अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, ६ मे रोजी राज्य शासनाच्या वतीने श्री क्षेत्र चोंडी येथे आयोजित विशेष मंत्रिमंडळ बैठकीत, क्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्यासाठी ६८१. ३२ कोटी तर पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून चोंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणा व उन्नतीसाठी ३६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. असा एकूण १०४१.३२ कोटींचा (६८१. ३२+३६०) भरीव निधी श्री क्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्यासाठी मंजूर उपलब्ध केल्याबद्दल आज पुन्हा एकदा राज्य शासनाचे आभार सभापती शिंदे व्यक्त केले.याप्रसंगी माजी मंत्री तथा महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक डॉ.अण्णासाहेब डांगे, माजी आमदार रामहरी रुपनर, श्रीराम पुंडे, सुनिल वाघ, सुभाषराव सोनवणे, डॉ.अलकाताई गोडे, चिमणभाऊ डांगे, वासुदेवराव आसकर, अशोक देवकाते, डॉ. पांडुरंग टोपे, बाबासाहेब राणगे, संदीप कुले, सुभाष करे, नंदाताई शेळके, पुष्पाताई गुलवाडे, शांतिलाल कोपनर, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे, अभिमन्यु सोनवणे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे यांच्यासह आदी पदाधिकारी, व राज्यभरातून आलेले अहिल्यादेवींचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button