बीड
धानोरा रोडच्या दयनीय रस्त्यासाठी तिसर्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना नगरसेवकांचे निवेदन

जिल्हाधिकार्यांना सुचना देत रस्ता पुर्ण करण्याचे दादांचे आश्वासन
बीड (प्रतिनिधी)-बीड शहरातील अत्यंत महत्वाचा आणि दैनंदिन वापराचा धानोरा रोड व अंकुश नगरचा रस्ता खड्ड्यांमुळे अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. या दयनीय परिस्थितीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने, नगरसेवक रणजीत बनसोडे, भैयासाहेब मोरे आणि विनोद मुळुक यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांना सलग तिसर्यांदा स्मरणपत्र देण्यात आले.
यावेळी या रस्त्याच्या अत्यवस्थेचे चित्र आणि नकाशा फ्रेम स्वरूपात सादर करत नागरिकांच्या त्रासाची जाणीव करून देण्यात आली. डीपीडीसी अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, अभियंता आणि संबंधित विभागांना देण्याचे आश्वासन अजित दादांनी दिले.
नगरसेवकांनी नमूद केल्याप्रमाणे, खड्डेमय रस्त्यांमुळे लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच दररोज त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता हा शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, मंगल कार्यालय, क्लासेस व गावांशी जोडलेला असल्याने, त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
त्याचबरोबर, नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील दोन वर्षांत मूलभूत सुविधांचाही बोजवारा उडालेला आहे. घंटागाड्या बंद, पोलवरील लाईट बंद, वॅक्युम क्लिनर निष्क्रिय, नाल्यांची सफाई होत नसल्याने आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात नगरसेवकांनी पालकमंत्री अजित दादांकडे नवीन वाहने खरेदी करण्यासाठी आवश्यक तरतूदीची मागणी केली, जेणेकरून स्वच्छता व नागरिकांसाठी आवश्यक सेवा वेळेत पूर्ण करता येतील.