अंथरवण पिंप्री आश्रमशाळेची विद्यार्थीनी तेजस्वीनी राठोड भारतीय आवकाश संशोधन संस्थेस भेटीसाठी पात्र

अंथरवण पिंप्री आश्रमशाळेची विद्यार्थीनी तेजस्वीनी राठोड भारतीय आवकाश संशोधन संस्थेस भेटीसाठी पात्र
बीड (प्रतिनिधी):- इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणार्या खाजगी अनुदानित विजाभजन अश्रम शाळा /विद्यानिकेतन शाळा / ऊसतोड कामगारांच्या शाळेतील निवासी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबद्दल अधिक माहिती मिळावी, या क्षेत्रात स्वरस्य निर्माण व्हावे तसेच विद्यार्थ्यांना खडठज ची यशोगाथा आणि विज्ञान जागृत करण्याची संधी मिळावी म्हणून राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा/ विद्यानिकेतन शाळा/ ऊसतोड कामगारांच्या शाळेतील एकूण शंभर विद्यार्थ्यांना खडठज या संस्थेत भेट देण्याकरता आज दिनांक 27. 7.2025 रोजी स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकालही आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत श्री सद्गुरु बंजारा सेवा संघ बीड संचलित उच्च माध्यमिक आश्रम शाळा अंथरवन पिंपरी तांडा तालुका बीड येथील विद्यार्थिनी कु. राठोड तेजस्विनी राम ही पात्र ठरली आहे. त्याबद्दल श्री.सद्गुरु बंजारा सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष दिनेशराव पवार, सचिव अतुलभाऊ पवार तसेच सुशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुशीलभाऊ पवार, प्राचार्य खंदारे एम.आर., मुख्याध्यापक शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



