📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अट्टल महाविद्यालयास उत्कृष्ट कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था पुरस्कार 

अट्टल महाविद्यालयास उत्कृष्ट कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था पुरस्कार
गेवराई, दि. १६ (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अंतर्गत जी.एस.टी. असिस्टंट व ग्राफिक डिझाईन हे दोन कोर्स चालवले जातात. जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्त जन शिक्षण संस्था बीड येथे दि. १५ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था म्हणून गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयास सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या हस्ते केंद्र समन्वयक डॉ. हनमंत हेळंबे, प्रशिक्षक डॉ. संदीप वंजारी, डॉ. राहुल माने, प्रा. स्वाती कुलकर्णी, प्रा. आदिती जाधव यांचे अभिनंदन करून गौरविण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक बालाजी रुपनर, प्रबंधक भास्कर सुरवसे आदींची उपस्थिती होती.
बीड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी सहाय्यक आयुक्त सुशील उचले, दै. दिव्य मराठीचे ब्युरो चिफ अमोल मुळे,
 दै. दिव्य लोकप्रभाचे उपसंपादक नितीन क्षीरसागर, प्रा. उपेद्र कुलकर्णी, श्री. गंगाधर देशमुख यांच्या हस्ते केंद्राचे समन्वयक डॉ. हनमंत हेळंबे यांना सन्मानित करण्यात आले होते. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राचार्य, केंद्र समन्वयक आणि प्रशिक्षकांवर प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि शिक्षणप्रेमी गेवराईकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
Back to top button