बीड

शिवाजी नगर परिसरात सौर दिव्याचे प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते उद्घाटन

शिवाजी नगर परिसरात सौर दिव्याचे प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते उद्घाटन

जामखेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा नियोजन २०२४ – २५ अंतर्गत, जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या सहकार्याने शहरातील महत्त्वाच्या १९ ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज, दिनांक १४ जुलै २०२५ रोजी शिवाजी नगर येथे करण्यात आला. उद्घाटन भाजपा नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, “सौरऊर्जा ही भविष्यासाठीची ऊर्जा आहे. वाढत्या विजेच्या किमती आणि पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर सौर दिवे ही एक दूरदृष्टी असलेली योजना आहे. शहराच्या विकासात ही योजना ठरेल. शिवाजी नगरसह शहरात सौर दिवे हे माता भगिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत आवश्यक होती.

मुख्याधिकारी अजय साळवे यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, सौर दिवे हे पर्यावरणपूरक आणि विजेची बचत करणारे साधन आहेत. हे दिवे सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळवून रात्री उजेड देतात. यामुळे पारंपरिक इंधनांवरील अवलंबन कमी होते, वीज बचते आणि प्रदूषण होत नाही. ग्रामीण भागात, जिथे वीज पोहोचत नाही तिथे हे दिवे फार उपयोगी ठरतात. कमी देखभाल खर्च आणि दीर्घकाळ वापरामुळे सौर दिवे हे स्वच्छ, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरतात.

यावेळी प्रा. लक्ष्मणराव ढेपे, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार, अमित जाधव, ॲड. प्रवीण सानप, पवन राळेभात, गोरख घनवट, उमेश माळवदकर, आकाश बारहाते, साहिल पवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button