रायगड जिल्हातील फलाणी येथे ग्रामस्थ तसेच ग्रामविकास तरुण मंडळ यांच्या वतीने हजारो झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा यशस्वी प्रयत्न

रायगड जिल्हातील फलाणी येथे ग्रामस्थ तसेच ग्रामविकास तरुण मंडळ यांच्या वतीने हजारो झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा यशस्वी प्रयत्न
प्रतिनिधी-नितेश पुरारकर.
आपल्याला झाडे आणि वनस्पतींमधून ऑक्सिजन मिळतो, जो आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्ग सर्व सजीवांवर वृक्ष आणि वनस्पतींच्या माध्यमातून अनंत उपकार करतो. झाडे आणि वनस्पती आपल्याला सावली देतात. आपल्याला झाडे आणि वनस्पतींपासून फळे आणि फुले देखील मिळतात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि प्रदूषण विरहित ठेवण्यासाठी झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहे. हेच उद्धिस्ट लक्षात घेता ग्रामस्थ मंडळ फलाणी तसेच ग्रामविकास तरुण मंडळ फलाणी यांच्या वतीने दिनांक. १३ जुलै २०२५ रोजी फलाणी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने गावदेवी मंदिर ,शाळा , मुख्य रस्ता,पाणवठा येथे विविथ प्रकारच्या वृक्ष्यांची लागवड करून पर्यावरचा संतुलन कायम ठेवण्याचा एक छोटासा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामस्थ मंडळ तसेच तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला.त्या बद्दल सर्वच स्तरावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे



