बीड
मिल्लीया महाविद्यालयात तंबाखूमुक्त जनजागृती अभियान

मिल्लीया महाविद्यालयात तंबाखूमुक्त जनजागृती अभियान
बीड: येथील मिल्लिया विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी तंबाखूमुक्त अभियानाचे फलक लावण्यात आले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता कार्यालयाच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्त कार्यालयाचे फलक लावण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर प्रा.शोएब पिरजादे यांनी तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगितले तसेच महाविद्यालय परिसरात नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. कोटपा कायदा 2003 बद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे असे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस एस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे, प्रा. शोएब पिरजादे, प्राध्यापिका डॉ. शामल जाधव, प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.



