बीड

आ.विजयसिंह पंडित साहेब शाळा आहे की मृत्युचा सापळा ? गेवराई तालुक्यातील ६२ शाळांमधील १२५ वर्गखोल्या धोकादायक :- डॉ.गणेश ढवळे

आ.विजयसिंह पंडित साहेब शाळा आहे की मृत्युचा सापळा ? गेवराई तालुक्यातील ६२ शाळांमधील १२५ वर्गखोल्या धोकादायक :- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड:- ( दि.३० ) बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २४७४ शाळा असुन याति२४१५ शाळा प्राथमिक तर ५९ शाळा माध्यमिक आहेत.जिल्हयात ११ तालुक्यातील ३४९ शाळांच्या ५९२ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असुन कुठे भिंती कुजलेल्या तर कुठे दरवाजे, खिडक्या मोडकळीस आलेल्या अवस्थेत असुन वादळ वा-यासह आलेल्या पावसाने अपघाताची शक्यता आहे. गेवराई तालुक्यातील ६२ शाळांमधील १२५ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असुन यांच्या दुरुस्ती व पुनर्बाधणींची आवश्यकता आहे त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांना केली आहे.

सविस्तर माहितीस्तव

गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा येथील जिल्हा परिषद शाळा अखेरच्या घटका मोजत आहे.सन १९५१ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत १ली ते ८ वी पर्यंत वर्ग भरत असुन एकुण ८ वर्गगखोल्यात जवळपास ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिर्ण झालेल्या वर्गखोल्यांची दुरावस्था पाहता वादळ वा-यासह आलेल्या पावसाने  केव्हाही कोसळु शकतात. वर्गखोल्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती, भिंतींना गेलेले तडे, काही भिंतीवरचा भाग निघुन पडत आहे.यामुळे वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचाही जीव धोक्यात आहे. जीर्ण झालेल्या शाळेच्या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार शिक्षण विभागाला केली आहे.मात्र शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Back to top button