बीड

शंभुराजे कुस्ती संकुलाच्या मल्लचा रशियात झेंडा;रोहित थोरातचे आंतरराष्ट्रीय यश ,कांस्यपदकाने सन्मानित

शंभुराजे कुस्ती संकुलाच्या मल्लचा रशियात झेंडा;रोहित थोरातचे आंतरराष्ट्रीय यश ,कांस्यपदकाने सन्मानित

मंगेश (दादा) आजबे यांच्या हस्ते रोहित थोरात चा गौरव

जामखेड प्रतिनिधी – जामखेड येथील शंभुराजे कुस्ती संकुलाचा कुस्तीपटू व खेळाडू रोहित शिवाजी थोरात याने मॉस्को (रशिया) येथे नुकत्याच पार पडलेल्या मॉस्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशु अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावले.

वंजारवाडी (ता. जामखेड) येथील रोहित थोरात याच्या या उल्लेखनीय कामगिरीने जामखेड तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे. रोहित याने याआधी राज्यस्तरीय वुशु स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले आहे.

त्याच्या या यशाबद्दल शंभुराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे यांच्या हस्ते रोहितचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तरडगाव,वंजारवाडी सोसायटीचे चेअरमन शहाजी केसकर, शरद शिंदे,हळगाव चे उपसरपंच आबासाहेब ढवळे, रोहित चे वडील शिवाजी थोरात बंडू मुळे आदींनी अभिनंदन केले.तसेच विविध स्तरांवर रोहित थोरात यांचे अभिनंदन केले जात आहे.

Back to top button