शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या ! प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयावर ‘ हेलगा’ आंदोलन !

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या !
प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयावर ‘ हेलगा’ आंदोलन !
अहमदनगर:-शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी ‘प्रहार’ चे संस्थापक अध्यक्ष मा आमदार बच्चू कडू हे अमरावती मधील माझोरी येथील संत गाडगेबाबा समाधी जवळ ते उपोषणास बसले आहेत.
त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष राम शिदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दि १३ रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर म्हशीचे ‘ हेलगे’ आणून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी हेलग्याच्या पाठीवर फडणवीस सरकारचा जाहीर निषेध असे लिहिले गेले होते. यावेळी शेवगाव शहरातील संत गाडगेबाबा चौकामधून हे आंदोलन सुरू करून शेवगाव तहसील कार्यालयावर नेण्यात आले. यावेळी पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी शेवगावचे प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांनी निवेदन स्वीकारले. तहसील कार्यालयात हेलगा शिरल्यानंतर कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला.
यावेळी प्रहार संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष राम शिदोरे, महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मी देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसान चव्हाण, उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे, वंचित बहुजन पार्टीचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, भायगाव गावचे सरपंच राजू आढाव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, बाळासाहेब धोंडे, आप्पासाहेब जगदाळे, भाऊसाहेब शिरसाठ, राहू कोळी, वामन सौदागर, लहू भवर, बाबा मिय्या सय्यद, किशोर पवार, सिताराम शिंदे, अविनाश देशमुख सह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



