बीड

श्री. क्षेत्र गहिनीनाथ गड संस्थानात मानाचे शुभ्र अश्व ( घोडे )अर्पण सोहळा थाटात पार पडला

श्री. क्षेत्र गहिनीनाथ गड संस्थानात मानाचे शुभ्र अश्व ( घोडे )अर्पण सोहळा थाटात पार पडला
माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीने अश्व( घोडे ) अर्पण; परमपूज्य विठ्ठल महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न
आष्टी प्रतिनिधि :-पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र गहिनीनाथ गड संस्थान येथे एका विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीने गड संस्थानास मानाचे दोन पांढरे शुभ्र अश्व  (घोडे)अर्पण करण्यात आले. या अश्वांचे ( घोडे )परमपूज्य ह.भ.प. श्री विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पूजन व स्वागत करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम दरम्यान मंत्रोच्चार, भजन, कीर्तन व पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. या पूजेसाठी विविध भागांतून आलेले शेकडो भक्तगण, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवा नेते डॉ. अजय दादा धोंडे, जि.प. सदस्य रामराव खेडकर, जि.प. सदस्य रामदास बडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, माजी सभापती अनिल जायभाये,डिंगाबर नाईकनवरे, युवा नेते आस्ताक भाई शेख,माजी उपसभापती देविदास शेंडगे,माजी सरपंच बाळासाहेब पवार, आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे, दिलीप म्हस्के फौजी,एम.एन बडे, काकासाहेब लांबरुढ, अभिलाष गाडेकर पाटील, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.घोड्यांचे स्वागत व अर्पण विधी गड संस्थानाच्या अध्यात्मिक सेवेसाठी एक ऐतिहासिक घटना ठरली असून, गड परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. भाविकांनी या सोहळ्याचे कौतुक करत माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या योगदानाची विशेष दखल घेतली.
Back to top button