बीड

वैद्यनाथ मंदिराचे पौराणिक व प्राचीन महत्व कायम ठेवून विकास कामे व्हावीत – ना. पंकजाताई मुंडेंनी केल्या सूचना

वैद्यनाथ मंदिराचे पौराणिक व प्राचीन महत्व कायम ठेवून विकास कामे व्हावीत – ना. पंकजाताई मुंडेंनी केल्या सूचना

*उप मुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला तीर्थक्षेत्र विकास योजनेतील कामांचा आढावा ;  ना. पंकजाताईंनी रोवली होती योजनेची मुहूर्तमेढ*

परळी वैजनाथ।दिनांक १९।
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत वैद्यनाथ मंदिर परिसरात जी कामे सध्या सुरू आहेत, ती दर्जेदार तर व्हावीतच पण त्याचबरोबर मंदिराचे पौराणिक व प्राचीन महत्व जपले जावे अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज परळी दौऱ्यावर होते. ना. पंकजाताई मुंडे हया त्यांच्यासमवेत दौऱ्यात होत्या. सकाळी शहरात आल्यानंतर प्रभू वैद्यनाथाचे त्यांनी दर्शन घेतले. वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिर परिसरातील तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची त्यांनी उप मुख्यमंत्र्यासह पाहणी केली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची आढावा बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे झाली, त्यावेळी ना पंकजाताई मुंडे यांनी बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. आ. धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना  वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. १३३ कोटी रूपये त्यांनी त्यावेळी मंजूर केले होते. नंतर यात वाढ होऊन  २८६ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला. या अंतर्गत  सुरू असलेल्या कामांना सध्या वेग आला आहे. ना. पंकजाताईंनी बैठकीत बोलताना म्हणाल्या, ही कामे दर्जेदार  व्हावीत, भक्त निवास, दर्शन मंडप, मंदिर परिसर सुशोभीकरण,यासह भाविक भक्तांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, मंदिराचे पौराणिक व प्राचीन महत्व कायम ठेवून विकास कामे व्हावीत याकरिता खबरदारी घ्यावी अशा सूचना यावेळी पंकजाताई मुंडे यांनी या बैठकीत केल्या.

*भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचे स्वागत*
———–
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ना. पंकजाताई मुंडे यांचे सकाळी ८ वा. हेलिकॉप्टरने  शक्तीकुंज वसाहत येथील हेलिपॅडवर आगमन झाले. भाजप सह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपच्या शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे, तालुकाध्यक्ष राजेश गिते, बंडू निर्मळ, माजी तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष विनोद सामत, विजय वाकेकर, संदीप लाहोटी, महादेव इटके, गणेश कराड आदींनी यावेळी त्यांचे स्वागत केले.

Back to top button