रायगड

14 वर्षानंतर रायगड जिल्हा असोशियन ची कबड्डी स्पर्धेची फायनल मारल्याबद्दल जाहीर सत्कार संपन्न.

14 वर्षानंतर रायगड जिल्हा असोशियन ची कबड्डी स्पर्धेची फायनल मारल्याबद्दल जाहीर सत्कार संपन्न.

पेण प्रतिनिधी :- स्वप्नील म्हात्रे.

कारावी रहिवासी संघटना पेण तर्फे
कारावी केरेश्वर मंदिराच्या सभागृहात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 14 वर्षानंतर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन फायनल मारल्याबद्दल सर्व खेळाडूंचा जाहीर सत्कार करण्यात आला
श्री सेवानंद महाराज समाधी सोहळा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला.
त्यामध्ये सकाळी सेवानंद बाबांची मिरवणूक काढण्यात आली तदनंतर सकाळी दहा ते साडेबारा कीर्तन साडेबारा वाजता महाआरती तदनंतर महाप्रसाद संपन्न झाला
त्याचेच औवचित्त साधून कारावी रहिवासी संघटना पेण तर्फे तब्बल 40 जणांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रायगड भूषण पुरस्कार / माजी सैनिक / ज्येष्ठ पंच / कराटे बॉक्सर / माजी पोलीस / तसेच सर्व खेळाडूंचे शाळ सन्मानचिन्ह एक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले. तसेच सर्व कारावी ग्रामस्थ तसेच पेण रहिवासी संघटना अध्यक्ष / सदस्य सर्व उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत खंडू पाटील आणि सर्व सभासदाने एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Back to top button