
लोकसेवेची एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत सुयश
द. सोलापूर तालुक्यातील सिना- भीमा खोऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये मंद्रूप येथील शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रूप, संचलित लोकसेवा विद्यामंदिर व क. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी- मार्च2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत भरघोस यश प्राप्त केले आहेत
विज्ञान शाखेचा निकाल 96.19% लागला असून यात कु. गोरनाळे वृषाली धानप्पा 80.83 टक्क्याने प्रथम व कु. दूधभाते वैष्णवी कल्लप्पा 79.83% द्वितीय तर कु.घेरडी भावना शंभूलिंग ही 77.83% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवली आहे. त्याचप्रमाणे
वाणिज्य शाखेचा निकाल 91.59% लागला आहे यामध्येही प्रथम क्रमांक 80.83% मार्क घेऊन कु. बिराजदार विजयालक्ष्मी राजकुमार आणि द्वितीय क्रमांक श्री बन्ने अभिषेक अमसिध्द 79.00 % तर तृतीय क्रमांकाने कु. मुलाणी सुमैय्या शिलेमान ही 77. 67% गुणांनी उत्तीर्ण झाले तसेच
कला शाखेचाही निकाल 51.02% लागलेला असून यामध्ये कु. छावरिया स्नेहा सुनील 60.00% प्रथम, कु. तांदळे किरण उमाकांत 53.33% द्वितीय तर कु.गायकवाड ज्योती बसवराज 52.83% तृतीय क्रमांक मिळवलेले आहेत
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंताचे कॉलेजच्या वतीने यांचे सत्कार करण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकाचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा. शिवशरण अण्णा पाटील, सचिव तथा माजी सभापती मा. गुरुसिद्ध मामा म्हेत्रे, सहसचिव तथा माजी युवा सरपंच मा. आप्पासाहेब म्हेत्रे, प्राचार्य तथा मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर सर, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद घाटे सर, पालक,समस्त प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.



