बीड

जयसिंह सोळंके यांना नवभारत- नवराष्ट्र वर्तमान समुहाचा मराठवाडा आयकॉन पुरस्कार प्रदान सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव

जयसिंह सोळंके यांना नवभारत- नवराष्ट्र वर्तमान समुहाचा मराठवाडा आयकॉन पुरस्कार प्रदान
सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव
वडवणी :  राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सामजीक ऊपक्रमाची दखल घेत नवभारत नवराष्ट्र वर्तमान समुहाच्या
वतीने रत्न सुंदर सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन,बीड जिल्हा परीषदेचे विद्यमान सभापती जयसिंग भैय्या सोळुंके यांना आयकाॅन या पुरस्काराने छञपती संभाजीनगर येथे
 ना.संजयजी शिरसट,सामाजिक न्याय मंञी, मा.ना.श्री. अतुलजी सावे, बहुजन कल्याण मंञी , आ.श्री.विक्रम काळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षा होत आहे.
       महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री स्व सुंदररावजी सोळुंके साहेब यांचे नातु,माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके यांचे पुतने,मा चेअरमन धैर्यसिल काका सोळंके यांचे चिरंजीव सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारण्याचे व्हा चेअमन,बीड जिल्हा परीषद मा सभापती जयसिंह भैया सोळंके हे सोळंके परिवाराचा राजकीय व सामाजिक वारसा सक्षम पणे पुढे चालवत राजकीय तसेच कानिफनाथ बहुउदेशीय संस्थेच्या माध्यमातुन गोरगरीब दिन दुबळ्यांची सेवा त्यांच्या हातून घडत आहे.वयोवृद्ध नागरीकांसाठी डोळ्यांचे शिबीर घेणे,शहरातील तसेच ग्रामीण भागातील महीलांना शेती व घर कामामुळे स्वतः कडे वेळ मिळत नसल्याने स्वत: च्या आजाराकडे दुर्लक्ष करत आसतात, त्यांच्यासाठी महिलांचे सर्व रोग निदान शिबीर घेणे,अनाथ कुंटुंबांना व आत्महत्या ग्रस्त कुटुंबांना अर्थिक मदत करणे,शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे अदी सामाजिक उपक्रमात सतत अग्रेसर आसल्याने त्यांच्या सामाजीक कार्याची दखल नवभारत- नवराष्ट्र वर्तमान समुहाचा मराठवाडा आयकॉन पुरस्कार संभाजीनगर येथे ना.संजयजी शिरसट,सामाजिक न्याय मंञी, मा.ना.श्री. अतुलजी सावे, बहुजन कल्याण मंञी , आ.श्री.विक्रम काळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आला. त्यांच्यावर सर्व स्थानातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Back to top button