म्हसळा तालुक्यातील ३९ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, ग्रामीण राजकारण तापणार

द. रा. जि. उपसंपादक: संतोष उध्दरकर.
म्हसळा:म्हसळा तालुक्यातील सन २०२५ ते २०३० दरम्यान सार्वत्रिक निवडणूक द्वारे गठीत होणाऱ्या ३९ ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आरक्षण सोडत २३ एप्रिल रोजी काढण्यात आली. न्यू इंग्लिश स्कुल सभागृहात उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी माधव जाधव, नायब तहसीलदार खोत यांच्या उपस्थितीत प्रथम जम्मू काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहून आरक्षण सोडतीचे ग्राम पंचायत निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.आपल्या गावात आपलेच आरक्षण पडावे ,यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. अखेर अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले तर अनेकांचे स्वप्न भंगले आहे.दरम्यान थेट जनते तून सरपंच पदाची निवड असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध राजकीय नेते मंडळीची उपस्थिती कमी जाणवली.नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी पाच ग्रामपंचायती आरक्षीत झाल्या आहेत.या ग्रामपंचायत मध्ये खारगाव खुर्द, रोहिणी, रेवळी, कांदळवाडा, फळसप या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सहा ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले.यामध्ये केलटे, खरसई, वरवटने, आंबेत, तोराडी, आडी महाड खाडी अनुसूचित जातीसाठी कोळे, अनुसूचित जाती स्त्री साठी खामगाव या ग्रामपंचायतीचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.अनुसूचित जमाती स्त्री साठी पाभरे, लेप तर अनुसूचित जाती साठी संदेरी या ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर झाले आहे.जांभूळ , घुम, मेंदडी, साळवींडे, तोंडसुरे, निगडी, घोणसे, भेकऱ्याचा कोंड, काळसुरी, पांगलोली, कोळवट, मंदाटने या ग्रामपंचायती मध्ये सर्वसाधारण स्त्री तर वावे, ठाकरोली, खारगाव बुद्रुक, देवघर, नेवरूळ,गोंडघर, वारल, तुरुंबाडी, चिखलप, कणघर याठिकाणी सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.



