बीड
अट्टल महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र कार्यशाळा संपन्न

अट्टल महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र कार्यशाळा संपन्न
गेवराई, दि. २०, (प्रतिनिधी):- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने समान संधी केंद्र अंतर्गत १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान समता पंधरवाडा राज्यातील इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. नवनाथ गोरे हे होते, तर कार्यक्रमासाठी
प्रमुख वक्ते म्हणून समाजशास्र विषयतज्ञ श्री. राजेंद्र राऊत हे होते.
जात वैधता प्रमाणपत्राचा उपयोग, आवश्यकता तसेच प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्र, ते गोळा करताना येणाऱ्या अडचणी इत्यादींची सविस्तर माहिती कार्यक्रमात देण्यात आली. तसेच कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसनही करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना श्री. गोरे यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले. कोणीही या संधीपासून वंचित राहू नये असा संदेश त्यांनी दिला. प्रबंधक भास्कर सुरवसे, कार्यालयीन अधीक्षक भागवत गवंडी, अशोक पावनपल्ले यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुदर्शना बढे यांनी केले तर प्रा. प्रेमदास राठोड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.



