
महावितरण कंपनीने केली महिला शेतकऱ्यांची फसवणूक
सिद्धकला कंपनी निवडली व सदभाव कंपनीचे सामान आले द्रोपती विष्णु बडे या महिला रा.उंबरमुळी येथील रहिवासी असून त्यांची महावितरण कंपनीने मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे या महिला शेतकरी मागेल त्याला सोलर पंप या महावितरण योजनेअंतर्गत या महिलेने आपला अर्ज दाखल केला सप्टेंबर मध्ये त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला व तुम्ही पैसे भरा व तुम्हाला कोणत्या कंपनीची निवड करायची ती करा असे सांगण्यात आले त्यानंतर त्यांनी सिद्धकला ही कंपनी निवडण्यात आली व त्यांची रक्कम जमा केली काही महिन्यांनंतर त्यांचे मटेरियल आहे तर आपण जी कंपनी निवडली आहे त्या कंपनीचे हे मटेरियल नाही व वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल आपल्या कडे आले आहे असे त्यांच्या लक्षात आले व त्यानंतर त्यांनी या क्षेत्राशी निगडीत अधिकारी मंडळींची भेट घेतली तर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत व त्यांच्या कडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही एक महिलेची तक्रार सुद्धा द्यायला तयार नाही आपली फसवणूक झाली आहे आणि आपण त्या विरोधात कायद्याने लढणार आहेत अशी त्यांनी तयारी दर्शवली आहे



