
ना. पंकजाताई मुंडे यांचा मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास
‘एक पेड माँ के नाम’ सोबतच ‘एक पेड पिता के नाम’ चा दिला संदेश
मुंबई दि. २१ —
योगा हे एकमेव साधन ज्याने शरीरासह मन आणि आत्मा आपण सुदृढ करू शकतो, शरीराला जसा व्यायाम आवश्यक आहे, तसाच मनाला देखील व्यायामाची गरज आहे आणि त्यासाठी योग हे उत्तम माध्यम आहे, त्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा असं आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पवई येथे महिलांसमवेत योगाभ्यास करून ना. पंकजाताईंनी आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.
पवई (मुंबई) येथील निसर्ग उद्यान रामबाग येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुंबईच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त महिलांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शक करताना त्या बोलत होत्या. मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती योजना ठोकळे यावेळी उपस्थित होत्या.
आपल्या शरीराला शास्त्रीय पद्धतीने सशक्त करण्याचे आणि निरोगी आरोग्य राखण्याचे योग हे महत्वपूर्ण साधन आहे. योगाचा नियमित अभ्यास करा असं त्या म्हणाल्या.
माता-पित्याच्या नावाने वृक्षारोपण करा
——
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ चा संदेश दिला आहे, त्यात मी एक लेक म्हणून ‘एक पेड पिता के नाम’ असा संकल्प जोडला आहे. कारण या दोघांचाही यात सन्मान असणार आहे. एक आपल्याला जन्म देणारी माता आणि दुसरा आपला जीवनदाता असा दोघांचाही सन्मान म्हणून वृक्षारोपण करा असा संदेश देत ना.पंकजाताईंनी याप्रसंगी वृक्षारोपण केले. यावेळी योगाभ्यास साठी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
••••



