📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ना. अजितदादांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याची विकासाच्या दिशेने झेप

ना. अजितदादांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याची विकासाच्या दिशेने झेप
सीआयआयटी स्थापनेनंतर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार-शेख निजाम
बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात औद्योगिक प्रशिक्षणासाठी १९१ कोटींची गुंतवणूक करण्याचा दिलेला शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी खरा करून दाखवला. डाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण प्रकल्प उभारण्यास मान्यता मिळाली आहे. एका मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याने विकासाच्या दिशेने झेप घेतली असुन
अजितदादांचा हा निर्णय बीडची दशा आणि दिशा बदलणारा ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख निजाम यांनी व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मोठे निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. सीआयआयटी स्थापनेच्या निर्णयानंतर आता बीडमध्ये पंचतारांकित एमआयडीसीचा प्रश्न
अजित दादाच मार्गी लावणार आहेत. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, माजी आ.अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे अनेक मुद्दे शेख निजाम यांनी मांडले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या धडाकेबाज निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली असुन दादांच्या नेतृत्वाखाली बीडचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास शेख निजाम यांनी व्यक्त केला आहे.
Back to top button