
जामखेड येथे हनुमान जयंती उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी – जामखेड शहरातील शनि चौक येथील श्री शनि /मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरी करण्यात आली.
दिनांक ११ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ह.भ.प. नारायण महाराज दौंड (ज्ञान कैवल्य वारकरी शिक्षण संस्था, आळंदी) यांचे प्रेरणादायी हरिकिर्तन झाले. त्यानंतर रात्री जागर भजनाचे आयोजन करण्यात आले. पहाटे ४ ते ५ दरम्यान महारुद्राभिषेक, ५ ते ६ भजन सेवा व ६.१५ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.अभिषेक व महाआरतीचा बहुमान बाळासाहेब गवळी, राजेंद्र जाधव (फिटर) यांना मिळाला.यावेळी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अभिषेक कर्त्यांच्या वतीने १०० किलो मोतीचूर लाडू व १०० किलो बूंदीचे वाटप करण्यात आले. मंदिर समितीच्या वतीने महाप्रसाद म्हणून लापशीचे वितरण करण्यात आले. तसेच अनेक भक्तांनी आपल्या शेरणीस्वरूप अर्पणांमध्ये गूळ, पेढा, डाळ इत्यादी वाटप केले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात , नगरसेवक अमित चिंतामणी,शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति चे विश्वस्त विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दिगांबर चव्हाण,कॅप्टन लक्ष्मण भोरे,बंडू जोशी, संजय गुरव (सिध्देश्वर),पिंटू गुरव ( सिद्धेश्वर) ,नागेश घायाळ ( देवा) ,राजुशेठ जाधव,अरुण लोहकरे, विनोद लोहकरे,पिंटूशेठ बोरा,सुमित खांडविकर,विठ्ठल परांडकर, प्रशांत राऊत,विशाल टाक,दादा कुलथे,निहाल सिध्देश्वर ,विजय कुलकर्णी आदी शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति व विठ्ठल भजनी मंडळ व भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास हिंदू बांधवांसह बौद्ध, वीरशैव, लिंगायत, जैन व मुस्लिम समाजाच्या बांधवांनीही सहभाग घेतल्यामुळे सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.



