बीड

सार्वजनिक बांधकाम विभागातील शेख शफीभाऊ यांचा लिंबागणेश ग्रामपंचायत मार्फत सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ

सार्वजनिक बांधकाम विभागातील शेख शफीभाऊ यांचा लिंबागणेश ग्रामपंचायत मार्फत सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ

लिंबागणेश:- ( दि.०३) बीड तालुक्यातील लिंबागणेशचे भुमिपुत्र शेख शफीभाऊ शेख अब्दुल हे नियत वयोमानानुसार पाटोदा सार्वजनिक बांधकाम विभाग येथुन निवृत्त झाले असुन आज दि.०३ गुरुवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीच्या वतीने शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते.कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचलन भिम टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ यांनी केले. शेख शफीभाऊ यांचे वर्गमित्र निवृत्त अभियंता गणपत तागड यांनी तसेच पत्रकार हरीओम क्षीरसागर,माजी सरपंच बाळासाहेब मुळे, ग्रामपंचायत सदस्य शेख समीर, रमेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.गणेश ढवळे यांनी  शेख शफीभाऊ यांनी केलेल्या सेवेचा व त्यांच्या कार्याचा गुणगौरव करीत असताना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखी, समृद्धी, आनंदाने जावो व त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो यासाठी शुभेच्छा दिल्या.सत्कारमूर्ती शेख शफीभाऊ यांनी सत्काराला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील भोकरदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग याठिकाणी २६ वर्षें सेवा केल्यानंतर १५ वर्षे बीड जिल्ह्यातील पाटोदा याठिकाणी ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाल्याचे सांगताना शासकीय नोकरी करत असताना गावच्या मातीची ओढ , त्यांना आलेले अनुभव कथन केले. ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या सत्कार समारंभाबद्दल सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच राजेभाऊ गिरे, संदिप मंडलिक, बाळकृष्ण थोरात,ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ , दामोदर थोरात, महादेव कुदळे, अशोक जाधव, अँड . गणेश वाणी,संतोष भोसले, अशोक वाणी,दादा गायकवाड, शेख खाजु,सय्यद रफिक,शेख अकबर मिस्त्री, आरूण ढवळे, राजेंद्र ढास ,अमोल जाधव ,राजेभाऊ आगवान
आदि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Back to top button