जामखेडची संस्कृती सौहार्दाची – तहसीलदार गणेश माळी यांच्याकडून प्रा. मधुकर राळेभात यांचे अभिनंदन!

जामखेडची संस्कृती सौहार्दाची – तहसीलदार गणेश माळी यांच्याकडून प्रा. मधुकर राळेभात यांचे अभिनंदन!
इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न ; प्रा. मधुकर राळेभात यांचा स्तुत्य उपक्रम!
जामखेड प्रतिनिधी – २५समाजात दुही पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात जामखेडने कायमच ऐक्य आणि शांततेचा संदेश दिला आहे. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना असे लक्षात येते की, पूर्वी गावांमध्ये कोण हिंदू, कोण मुस्लिम असा भेदभाव न करता सर्वजण एकत्र राहायचे. हीच संस्कृती जामखेडने जपली आहे.असे प्रतिपादन तहसीलदार गणेश माळी यांनी केले.
जामखेड शहरातील मक्का मस्जिद जामखेड येथे जेष्ठ नेते प्रा. मधुकर( आबा )राळेभात मित्र परिवाराच्या वतीने सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रमजान महिन्याचे निमित्त मुस्लिम रोजदार बांधवांसाठी
इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमासाठी तहसिलदार गणेश माळी,पोलीस निरीक्षक महेश पाटील, जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात,मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष,अझहर भाई काझी, शेरखान चाचा,नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक अमित जाधव,इस्माईलभाई सय्यद, जावेद सय्यद,मुख्तार सय्यद, ॲड शमा हाजी कादर,बाफना उद्योग समूहाचे आकाशशेठ बाफना,राहुल उगले, अवधूत पवार,डॉ अल्ताफ शेख, इस्माईल शेख (टेलर), हाजी मंजूर सय्यद, उमरभाई कुरेशी,इम्रान कुरेशी, जुबेर शेख,वसिम कुरेशी ( बिल्डर),ॲड हर्षल डोके, जमीर सय्यद, सलिम तांबोळी,गोकुळ गायकवाड,निलेश बोरा , दिपक खेडकर,मोईज शेख,ॲड अमृत राळेभात,भरत राळेभात, विशाल बारवकर,यांच्या सह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना तहसीलदार माळी म्हणाले की,या पवित्र सणानिमित्त आयोजित कार्यक्रमातूनही हेच संदेश दिले गेले. प्रा. मधुकर राळेभात यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात शांतता, बंधुता आणि एकात्मता वृद्धिंगत होत आहे.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की,सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण करण्यासाठी प्रा. राळेभात यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून जामखेडच्या सांस्कृतिक परंपरेला सन्मान दिला आहे.प्रा.राळेभात यांचे कार्य प्रेरणादायी आहे
यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, ॲड. शमा हाजी कादर, अझहरभाई काझी, उमरभाई कुरेशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवव्याख्याते प्रा.जाकीर शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन पवन राळेभात यांनी मानले.यावेळी मुस्लिम बांधवांना उपवास सोडण्यासाठी भजे,जिलेबी,खजूर,केळी, टरबूज देण्यात आले होते.
*शांतता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी – प्रा. मधुकर राळेभात*
समाजात शांतता आणि ऐक्य टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे.
शांतता राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने त्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना थारा न देता, एकजूट टिकवण्यासाठी आपले योगदान द्यायला हवे.



