बीड

जामखेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर ; शंभूसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब संस्था नवचैतन्याचे केंद्र – आकाश बाफना जामखेड प्रतिनिधी –

जामखेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर ; शंभूसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब संस्था नवचैतन्याचे केंद्र – आकाश बाफना

जामखेड प्रतिनिधी –
जामखेडच्या श्री शंभू सूर्य मर्दानी खेळ योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेने परंपरेचे जतन करत नव्या पिढीला आधुनिकतेच्या प्रवाहात घडवले असून, देशपातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे मार्गदर्शक संतोष टेकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेल्या या संस्थेत ५ ते २० वयोगटातील मुले व मुली सातत्याने प्रशिक्षण घेत आहेत.

शनिवार, दिनांक २८ जून २०२५ रोजी सायंकाळी संस्थेच्या प्रांगणात हनुमान आरती व मल्लखांब प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष व युवा नेते आकाश बाफना यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.

मुंबई, पुणेच नव्हे तर देशभरात ही मुले विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. ही संस्था केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर मानसिक शिस्त आणि परंपरेची जपणूक करणारे कार्य करीत आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीसाठी ही संस्था म्हणजे नवचैतन्याचे केंद्र आहे, असे गौरवोद्गार बाफना यांनी काढले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मल्लखांबाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी संस्थेच्या वतीने आकाश बाफना यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक बबलु (वस्ताद) टेकाळे,उपाध्यक्ष राजेंद्र भांबे ,सचिव अमोल निमोणकर,संजय वारे,रविराज क्षिरसागर, रोनित खुपसे, गणेश माने,बबलु राऊत,माऊली शिंदे आदी उपस्थित होते.

इतिहास, परंपरा व वारशाचे जतन करत नव्या पिढीला घडवणाऱ्या या संस्थेला प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसोबत एक वेळ नक्की भेट द्यावी,असे आवाहनही बाफना यांनी शेवटी केले.

Back to top button