बीड

चाळण झालेल्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी निधी नाही मात्र चांगल्या रस्त्यावरच दुबार काम ; नगरपालिकेचा मनमानी कारभार ; सोमवारी आंदोलनाचा ईशारा :- डॉ.गणेश ढवळे

चाळण झालेल्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी निधी नाही मात्र चांगल्या रस्त्यावरच दुबार काम ; नगरपालिकेचा मनमानी कारभार ; सोमवारी आंदोलनाचा ईशारा :- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड:- ( दि.१८) बीड शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने शहरातील बहुतांश रस्त्याची चाळण झालेली आहे.त्यामुळे वाहनचालकांना मुठीत जीव घेऊन कसरत करत वाहन चालवावे लागते. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बशीरगंज रस्त्याची पुर्ण चाळण झालेली आहे.या रस्त्यावर खड्डे,वाळु,वाळु मिश्रित खडी, असल्याने धुराळा उडत असुन नागरीकांना श्वसनाचे आजार जडण्याचा धोका आहे.या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरीकांनी वारंवार नगरपरिषद प्रशासनाला केलेली आहे.मात्र नगरपरिषद प्रशासन दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे रडगाणे गात आहे.मात्र याचवेळी प्रमुख रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्या ऐवजी नगरपालिकेने नगरपालिका कार्यालयासमोरील केवळ नगरपालिकेत येणाऱ्या वाहनांची वर्दळ असणाऱ्या आणि रस्त्यावर कुठेही खड्डे नसताना चांगल्या सुस्थितीत असलेल्या सिमेंट रस्त्यावरच पुन्हा दुबार सिमेंट रस्त्याचे काम केले आहे. त्यामुळे एकंदरीतच प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी निधी नसल्याचे कारण सांगणा-या नगरपालिका प्रशासनाने चांगल्या रस्त्यावरच दुबार रस्ता करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी का केली?? हा प्रकार ठेकेदारांचे खिसे भरण्याचा प्रकार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला असून मुख्य रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत या मागणीसाठी सोमवारी या प्रकरणी नगरपरिषद कार्यालयावर लक्ष्यवेधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Back to top button