बीड

ल.ना.होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्जवल यश

ल.ना.होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्जवल यश

जामखेड प्रतिनिधी;-यश जाधव व अनिल जगदाळे या दोन्ही विद्यार्थ्यांची यशस्वी झेप ही अतिशय अभिमानास्पद व सुवर्णक्षण आहे.असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख यांनी केले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचे दोन तुरे यामध्ये चि.यश दीपक जाधव व चि.अनिल कारभारी जगदाळे या दोन्ही विद्यार्थ्यांची पोलीस दलात भरती झाले असून विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, प्राचार्य बाळासाहेब पारखे,माजी प्राचार्य अनंता खेत्रे,उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रवीण गायकवाड,पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने,वरिष्ठ लिपिक ईश्वर कोळी,राम होशिंग,प्रा.युवराज भोसले,आघाव सर,कलाशिक्षक मुकुंद राऊत,भरत लहाने,डॉ संजय समुद्र, हनुमंत वराट, विनोद धुमाळ,सिध्दू पवार, विशाल पोले आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यश जाधव व अनिल जगदाळे हे विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यांच्या यशस्वितेमध्ये क्रीडा विभागातील अध्यापक राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंके, धिरज पाटील,पोपट जरे,एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे व कॅप्टन गौतम केळकर यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या यश प्राप्ती केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

Back to top button