बीड

कन्या विद्यालयात “आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत ८०० विद्यार्थिनींनी केले महावाचन

कन्या विद्यालयात “आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत ८०० विद्यार्थिनींनी केले महावाचन

वडिलांनी केलेले सु-संस्कारातून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण – संजय हजारे

जामखेड प्रतिनिधी;-श्यामची आई माहित आहे, परंतु श्यामचा बाप माहित नाही.”पंचभाऊ या कथा संग्रहाचे लेखक एकनाथ चव्हाण यांनी आपल्या या कथासंग्रहातून भारतीय संस्कृती ,एक कुटुंबपद्धती व वडिलांनी केलेले सु-संस्कार यातून आपले व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली आहे.असे प्रतिपादन मुख्याध्यापक संजय हजारे यांनी केले.*

रयत शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय येथे ” आनंददायी शनिवार ‘ या उपक्रमांतर्गत दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता ‘पंच’ भाऊ या कथासंग्रहाचे लेखक एकनाथ चव्हाण ( आदर्श शिक्षक -प्राथमिक शिक्षक) यांच्या पुस्तकाचे कन्या विद्यालयात सुमारे ८०० विद्यार्थिनींनी एकाच वेळेस महावाचन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री डोईफोडे सर,पोकळे सर व विद्यार्थिनींनी सरांच्या ” पंचभाऊ ‘ या कथेविषयी मनोगत व्यक्त केले.
चव्हाण सरांची कथा ही अत्यंत भावस्पर्शी सत्य घटनेवर व वास्तवाला धरून आहे त्यामुळे ती काळजाला जाऊन भिडते. सरांच्या “पंच भाऊ’ या कथासंग्रहास विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच गुरुकुल उपक्रमांतर्गत दुसरा उपक्रम राबवण्यात आला तो म्हणजे जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ.शशांक शिंदे यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय हजारे होते तर प्रमुख पाहुणे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ शशांक शिंदे, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार हे होते.
यावेळी पर्यवेक्षक श्री गडगुले सर, यादव सर, श्रीमती अर्चना शिंदे, विशाखा ससाणे, साळुंखे मॅडम ,लोंढे मॅडम, श्रीम.मुसळे मॅडम, सौ.गायकवाड मॅडम श्रीम. साठे मॅडम तसेच श्री ठाकरे सर, पवार सर,वारे सर,जाधव सर, ठोंबरे सर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष सरसमकर व शंभूदेव बडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुकुल विभाग प्रमुख बाबासाहेब आंधळे यांनी मानले.

Back to top button