बीड
राहुलजी गांधी यांच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या समर्थनात बीड तालुका व शहर काँग्रेसचे आंदोलन

राहुलजी गांधी यांच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या समर्थनात बीड तालुका व शहर काँग्रेसचे आंदोलन
वोट चोरीचा घोटाळा करून सत्तेत बसलेल्या सरकारला पायउतार केल्याशिवाय शांत बसणार नाही – गणेश बजगुडे
वोट चोर गद्दी छोड चा नारा देत मतदार प्रक्रियेत झालेल्या वोट चोरी विरोधात व मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष द्यानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन आज ०१ नोव्हेंबर २०१६ रोजी रामलीला मैदान दिल्ली येथे राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून बीड तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील, शहराध्यक्ष मोहम्मद इलियास टेलर, जिल्हा सरचिटणीस मिलिंद मस्के, माजी नगरसेवक शेख अमर, कामगार काँग्रेसचे अध्यक्ष संतोष निकाळजे, निराधार निरक्षित विभागाचे अध्यक्ष शेख मोहसीन, इंटक काँग्रेसचे अध्यक्ष रामधन जी जमाले, वडवणी तालुकाध्यक्ष शिवाजी कोठुळे, युवक काँग्रेसचे विजय पवार, शेख जहीर, फरान सय्यद, मोहम्मद खमृद्दीन, मुजीब ए वन टेलर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.


