📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शेतकरी प्रचंड संकटात!  दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लक्ष रु.ची  मदत करा व जनावरांना छावण्याची सोय करा*- सरकारला बीड शहर बचाव मंचाची मागणी 

*शेतकरी प्रचंड संकटात!  दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लक्ष रु.ची  मदत करा व जनावरांना छावण्याची सोय करा*- सरकारला बीड शहर बचाव मंचाची मागणी
बीड (प्रतिनिधी ) : पावसाने पूर्णतः पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यासह  मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे. संपूर्ण मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून बळीराजाला हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने करण्यात यावी याबाबत बीड शहर बचाव मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. काल अक्षरशः बळीराजांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या निरुत्साही परिस्थितीत  पोटाला चिमटा काढून कृतज्ञतेने बैलपोळा सर्वत्र साजरा केल्याचे आपणास पहावयास मिळाले . निसर्गाने मागील वर्षी अतिवृष्टीचा मारा करून बळीराजाला संकटात टाकले होते. चालू वर्षी वरून राजाने पूर्णतः पाठ फिरवून वक्रदृष्टी करून मराठवाड्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील बळीराजाला अक्षरशः मेटाकुटीला आणलेले असून अगोदरच कर्जाच्या खाईत सापडलेल्या बळीराजाची खरीप हंगामाची सर्वच पिके हातची गेलेली आहेत. आज बळीराजा प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला असून खऱ्या अर्थाने त्याला तातडीने आर्थिक मदतीचा आधार देणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रत्येक बळीराजाला हेक्टरी एक लाख रुपयाची तातडीची मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर आता बळीराजाला गुरांच्या चाऱ्या पाण्याची  दुसरी मोठी चिंता सतावू लागलेली आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये भीषण पाणी टंचाईचा प्रश्न डोक वर काढत आहे. त्या अनुषंगाने गुरांच्या छावण्या चालू करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. चालू वर्षी पावसाळा संपत आला  तरी पाऊसच झालेला नसल्याने व पाऊस पडत नसल्यामुळे बळीराजाला चहाचा कप पितानाही अनेक वेळा विचार करायची वेळ आली आहे, बळीराजा चहा सुद्धा अनेकवार विचार करून पीत आहे . आता शेतकरी चहूबाजूंनी संकटांच्या खोल दरीत सापडलेला आहे. देशाचा व करोडोंचा पोशिंदा आभाळाकडं एक टक लावून  पावसाची वाट पाहत आहे. बेंबीच्या देठापासून पावसाला आर्त हाक मारत आहे. परंतु निसर्गाला काही मायेचा पाझर फुटताना दिसत नाही व निसर्ग काही बळीराजाच्या मदतीला येताना दिसत नाही . पाऊस पडण्याची वेळ निघून चाललेली आहे. त्यामुळे शासनाने आता बळीराजाचे दुःख पाहून व समजून घेऊन त्याला भरीव मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. आपला सर्वांचा पोशिंदाच उपाशी राहत आहे हे शासनाच्या लक्षात का येत नाही ? हा प्रश्नही  उपस्थित झाला आहे. बळीराजाच्या आत्महत्या होऊ नयेत व पशुधनाची जीवितहानी होऊ नये यासाठी शासनाने ठोस पावले उचलून बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वेळ आलेली आहे. तसेच शासनाने ठोस पावले उचलून बळीराजाला हेक्टरी एक लाख रुपयाची मदत तातडीने द्यावी तसेच गुरांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तातडीने छावण्या उभ्या करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी बीड शहर बचाव मंचाच्या  वतीने दिनांक 11 सप्टेंबर 2026 शुक्रवारी रोजी  निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे,  महसूल मंत्री, कृषी मंत्री,अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाने बळीराजाला वाचवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात ही नम्र विनंती या निमित्ताने करण्यात आली आहे. सदर निवेदन बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे. तसेच सदर निवेदन प्रत्यक्ष सादर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बीड शहर बचाव मंचाचे ॲडव्होकेट प्रतिनिधी रवाना झालेले आहेत. हे निवेदन सादर करताना बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीन जायभाये, कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल बारगजे, डॉ. संजय तांदळे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Back to top button