बीड

हिंगणी बुद्रुक ते आमला रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा: रणजीत रूपनर

हिंगणी बुद्रुक ते आमला रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा: रणजीत रूपनर

बीड // प्रतिनिधी

धारूर तालुक्यातील हिंगणी बुद्रुक ते आमला हा रस्ता मागील दोन वर्षापासून त्यावर खडीकरण करण्यात आले आहे मात्र अद्यापही त्यावर कार्पेट न टाकल्यामुळे त्या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत मोटरसायकल ऑटो रिक्षा खड्डे झाल्यामुळे स्लीप होऊन एक्सीडेंट होत आहेत तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन पंधरा दिवसात आपण हे काम व साईट पट्ट्या पूर्ण कराव्यात साईट पट्ट्या न केल्यामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे त्यामुळे खड्डे पडत आहेत तरी प्रशासनाने संबंधित गुत्तेदारास पंधरा दिवसाच्या आत काम करण्यास सूचना द्याव्यात अन्यथा लोकशाही पद्धतीने आपल्या उपविभागीय कार्यालय धारूर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने व ना.पंकजाताई साहेब मुंडे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते श्री माधव तात्या निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन करण्यात येईल.यावेळी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा धारूर

Back to top button