बीड
‘नाथकृपा पेट्रोलियम’चे दिमाखदार लोकार्पण ग्रामीण विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा – आ. सुरेश धस

‘नाथकृपा पेट्रोलियम’चे दिमाखदार लोकार्पण
ग्रामीण विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा –
आ. सुरेश धस
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सांगवी (पा.) येथे भारत पेट्रोलियमच्या ‘नाथकृपा पेट्रोलियम’ या अत्याधुनिक इंधन केंद्राचे लोकार्पण मराठवाडाभूषण लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संत-महंत, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
लोकार्पण सोहळ्यास ह.भ.प. सुदर्शन महाराज (सांगवी पाटण), महंत श्री स्वामी महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान, पिंपळवंडी), ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वरगड, महिंदा), ह.भ.प. काशिनाथ महाराज (गणेशगड, नागतळा), ह.भ.प. काशिनाथ महाराज शास्त्री (संस्थान, सांगवी (पा.)), ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे (महादेवदरा, बीड सांगवी), ह.भ.प. सुदर्शनमुनी उदासीन (सुदर्शन आश्रम, शिदेवाडी), ह.भ.प. आजीनाथ आंधळे महाराज (माणिकोंडी), ह.भ.प. अशोक महाराज शास्त्री (गोविंदगड, हातोला), ह.भ.प. आप्पा महाराज भगत, ह.भ.प. अशोक महाराज भोसले (बळेवाडी), ह.भ.प. विष्णु महाराज आंधळे (रामगड संस्थान), ह.भ.प. संतोष महाराज मोरे (मोरेवाडी), ह.भ.प. बाबासाहेब महाराज कुलकर्णी (सांगवी (पा.)), भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष युवानेते गणेश शिंदे, माजी सभापती बद्रीनाथ जगताप, शांतीलाल भोसले, आदिनाथ सानप, संजय गाढवे, संदीप खाकाळ, गणेश मोकाशे, राजेंद्र दहातोंडे, आण्णासाहेब चौधरी, पोपट धुमाळ, विजय गाढवे, दाणी मामा, अशोक गर्जे, गौतम आजबे, गणेश डोंगरे, एन. टी. गर्जे, डॉ. युवराज तरटे, दादासाहेब जगताप, दिपक वामन, विलास शिरसाठ, शेषराव गर्जे, बिटू पोपळे, प्रविण वारे, तान्हाजी अनभुळे, विठ्ठल गर्जे, युवराज वायभासे, संदीप खराडे, डॉ. पंडित खिलारे, नंदकिशोर करांडे, डॉ. अकिल सय्यद, बाळासाहेब गुट्ठे, पोपटराव गोंडे, सूर्यकांत वायभासे, चांगदेव शेळके, हनुमंत जंजिरे, शिवलिंग लगड, दिनेश पोकळे, रमेश डोके, हनुमंत गळगटे, अभय गर्जे, प्रविण भुकन, भारत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सुरेश धस म्हणाले की, “जागतिक संघर्षाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे महत्त्व संपूर्ण जगाला समजले. आज प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनात इंधन ही अत्यावश्यक गरज बनली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आधुनिक सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे.”
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना त्यांनी उपस्थितांना प्रत्येकाने किमान दहा झाडे लावण्याचे आवाहन केले. “आपल्या भागात तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचत आहे. वाढदिवस, पुण्यस्मरण किंवा कोणताही सामाजिक कार्यक्रम असो, वृक्षारोपण करण्याची परंपरा निर्माण झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या मार्गासाठी तब्बल ९६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. अपघातप्रवण वळणे दूर करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.तसेच तारकेश्वरगड ते खडकत, कडा ते वांजरा फाटा आणि ब्रह्मगाव फाटा ते भगवान भक्तीगड या महत्त्वाच्या रस्त्यांसाठीही प्रयत्न सुरू असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.’नाथकृपा पेट्रोलियम’ या नावामागील भावना स्पष्ट करताना आ. धस म्हणाले की, “हा परिसर नाथ संप्रदायाची परंपरा जपणारा आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपाला ‘नाथकृपा’ हे नाव देण्यात आले आहे. मरकड बापू, त्यांचे पुत्र व पुतणे यांनी ग्रामीण भागात उद्योग उभारून रोजगारनिर्मितीचा आदर्श निर्माण केला आहे.असे शेवटी त्यांनी सांगितले.
मी प्रास्ताविक मध्ये शत्रुघ्न मरकड म्हणाले की, या भागातील वाहतूकदारांना येणाऱ्या अडचणी होय मी हा निर्णय घेतला तसेच मला हा निर्णय घेण्यासाठी उद्योजक तानाजीअनभुले यांच्या नावाने लागलेला लकी ड्रॉ त्यांनी मला सुपूर्त त्याच्या अवचित साधून हा मला पेट्रोल पंप चालण्याचे योग आला असून मी अत्यंत सुविधांनी हा पंप चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.
या कार्यक्रमाचे आभार विजय मरकड यांनी मांडले तर सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर सर यांनी केले.



