बीड

खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवली येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवली येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीवर्धन (संदेश घोलप):

जनतेचे लाडके, विकासाचे शिल्पकार आणि रायगडचे लोकप्रिय खासदार आदरणीय मा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत वडवली येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या समाजोपयोगी उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्यसेवा उपक्रमाचा लाभ परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या शिबिराचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

​या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. मंदारभाई तोडणकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. मोहम्मदभाई मेमन, पंचायत समिती सभापती मा. श्री. सचिनभाई कीर आणि मतदारसंघ अध्यक्ष मा. श्री. उदयदादा बापट यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

​त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. श्री. रमेश घरत, ग्रुप ग्रामपंचायत वडवलीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य-सदस्या, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक सहभागाने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी रित्या पार पडला.

​”लोकप्रतिनिधी म्हणून विकासाभिमुख दृष्टी, जनतेप्रती असलेली निष्ठा आणि समाजसेवेचा अखंड ध्यास यामुळे मा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे,” अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

​तसेच तटकरे साहेबांच्या भावी कार्यास अधिकाधिक यश लाभो, त्यांना उत्तम आरोग्य, निरोगी, दीर्घ आणि सुखसमृद्ध आयुष्य लाभो, व त्यांच्या हातून जनकल्याणाची सेवा अशीच अखंडपणे घडत राहो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

Back to top button