अठराविश्वे दारिद्रयाचा आमचा वनवास कधी संपणार?ॲड.डॉ.अरूण जाधव

अठराविश्वे दारिद्रयाचा आमचा वनवास कधी संपणार?ॲड.डॉ.अरूण जाधव
मुशाफिरी यात्रेचा यवत येथे दुसरा टप्पा
जामखेड – आज दिनांक ९ जून २०२६रोजी
मुशाफिरी यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रवास पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथील नाथपंथी डवरीगोसावी वस्ती येथे पोहचली.
ग्रा.पं.सदस्य(यवत) येथील श्रीमती मंगलताई खेडकर व मोहन शेगर यांच्या नियोजनाखाली ही सभा झाली.या ठिकाणी हा समाज अनेक वर्षांपासून बहुरूपीच्या कला करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात.
यावेळी सभेला मार्गदर्शन करताना ॲड.डॉ.अरूण जाधव यांनी सांगितले की,संविधानाने आपल्याला हक्क व अधिकार दिले.परंतु देशातील राजकीय व्यवस्थेने भटके विमुक्त समाजाचे सर्व बाजूंनी लचके तोडून जीवन उद्ध्वस्त केले आहे.आम्ही या देशात जन्मलो परंतु मेल्यानंतर आम्हांला जाळायला व पुरायला जागा अभावी संघर्ष करावा लागतो.तरी या सरकारने आमच्या पालात,कुडात,छप्परात राहणाऱ्या मदारी समाजाची घरगणना व जनगणना करून अठराविश्वे दारिद्रयाचा
आमचा वनवास थांबवावा.
यावेळी तुकाराम शिंदे सर,तानाजी चौगुले, विजय कदम यांची भाषणे झाली.या कार्यक्रमाला ऋषिकेश गायकवाड,जाकीर तांबोळी, मोहन शेगर,नारायण शिंदे,बाळासाहेब काळे, पंढरीनाथ सावंत,बाबासाहेब सावंत,रूपचंद सावंत,सुदाम शिंदे,तानाजी शिंदे,मच्छिंद्र शिंदे, अजय शिंदे,दादा शिंदे,शोभा सावंत,संगीता शिंदे,दिपाली शेगर,लता सावंत,छाया सावंत, कलावती सावंत,नाथा सावंत,संगीता शिंदे,महादेव शिंदे, विजय शिंदे,संगीता शिंदे,सागर चव्हाण,आनंद चव्हाण,किरण चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तुकाराम शिंदे यांनी केले तर मोहन शेगर यांनी आभार मानले.



