बीड

मतदारांनो सावधान! तीन वेळा संधी मिळणार; अन्यथा मतदानाचा हक्क धोक्यात

मतदारांनो सावधान! तीन वेळा संधी मिळणार; अन्यथा मतदानाचा हक्क धोक्यात
राज्यात लवकरच एसआयआर विशेष मतदार पडताळणी मोहीम
बीड | प्रतिनिधी | 21 मे 2026
मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने राज्यात पुढील महिन्यापासून एसआयआर (Special Intensive Revision – विशेष सखोल मतदार पडताळणी) मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक मतदाराची माहिती तपासली जाणार असून नागरिकांनी वेळेत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन ब्राईट सोशल फाऊंडेशन, बीड यांनी केले आहे.
या मोहिमेदरम्यान बीएलओ (Booth Level Officer) नागरिकांच्या घरी भेट देऊन माहिती व आवश्यक तपशील संकलित करणार आहेत. ज्या मतदारांनी निर्धारित कालावधीत गणना प्रपत्र भरले नाही किंवा बीएलओंशी संपर्क केला नाही, त्यांच्या नावावर परिणाम होऊ शकतो.
बीएलओ तीन वेळा देणार भेट
मतदार घरी उपलब्ध नसल्यास घराबाहेर सूचना दिली जाणार असून बीएलओंकडून तीन वेळा संपर्काचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही माहिती न दिल्यास प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
एसआयआर मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे
• 20–29 जून – बीएलओ प्रशिक्षण
• 30 जून–29 जुलै – घराघरांत माहिती संकलन
• 5 ऑगस्ट – प्रारूप मतदार यादी जाहीर
• 5 ऑगस्ट–4 सप्टेंबर – दावे व हरकती स्वीकारणे
• 7 ऑक्टोबर – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
कोणाला काय करावे लागेल?
2002 च्या मतदार यादीत नाव असलेले – फक्त माहिती मॅपिंग पुरेसे.
1 जुलै 1987 पूर्वी जन्मलेले – जन्म व जन्मस्थळ सिद्ध करणारा एक अधिकृत दस्तावेज आवश्यक.
1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान जन्मलेले – स्वतःचा आणि पालकांपैकी एकाचा पुरावा आवश्यक.
2 डिसेंबर 2004 नंतर जन्मलेले – स्वतःसह आई-वडिलांचेही आवश्यक दस्तावेज सादर करावे लागतील.
नागरिकांसाठी आवाहन
मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, बीएलओंना सहकार्य करावे आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत.
“मतदानाचा हक्क टिकवायचा असेल तर एसआयआर पडताळणी वेळेत पूर्ण करा!”
– जनजागृती अभियान, ब्राईट सोशल फाऊंडेशन, बीड
Back to top button