बीड

अटल अर्बन बँकेचे व्यवस्थापक ॲड. शेख रऊफ आब्बास यांना ‘पद्मपाणी’ पुरस्काराने सन्मानीत

अटल अर्बन बँकेचे व्यवस्थापक ॲड. शेख रऊफ आब्बास यांना ‘पद्मपाणी’ पुरस्काराने सन्मानीत

बीड प्रतिनिधी-बीड शहरातील अटल अर्बन बँकेचे व्यवस्थापक ॲड. शेख रऊफ आब्बास यांची सामाजिक, लोकहितवादी तसेच कर सल्लागार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सन २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘पद्मपाणी’ राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मान
करण्यात आला. पद्मपाणी प्रतिष्ठान बीड व सा. जनसूर्य यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही व अखंड भारत देशाप्रती निर्भिड व प्रामाणिपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्मा पाणी प्रतिष्ठान बीड तर्फे पद्मपाणी राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

आदर्श शिक्षक, उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी शिवाय विविध क्षेत्रात सामाजिक उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची निवड करून हा पुरस्कार दिला जातो.
2026 करीता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे दिलीप तरकसे सचिव, पदमपाणि प्रतिष्ठान, बीड यांच्या संकल्पनेतून पद्मपाणी
पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उ‌द्घाटक तथा अध्यक्ष जितीन रहेमान मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड,
विशेष अतिथी मयुरेश मोरे प्रा.शिक्षणाधिकारी बीड चंद्रकांत प्रकाश शेळके तहसिलदार, पल्लवी जाधव पोलीस उपनिरीक्षक आरती संजय बनसोडे ,सभापती, बालकल्याण न.प.बीड)
सुहास हजारे (नायब तहसिलदार, बीड,.प्रा.डॉ. दुष्यंता रामटेके ,के. एस. के. कॉलेज, बीड, पात्रे साहेब,भगवानराव सोनवणे नवनाथ पोटभरे, अमोल जगताप अध्यक्ष. भा. बौध्द महा. जि. जालना,आदी मान्यवर उपस्थित होते.
Back to top button