बीड

डॉ.गणेश ढवळे मातृभूमी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

डॉ.गणेश ढवळे मातृभूमी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
बीड (प्रतिनिधी) – दिवंगत सामाजिक कार्यकर्ते हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी  यांच्या संकल्पनेतून सन २०२१ साली चंपावतीरत्न पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांना देण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते. हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीणकुमार पालीमकर व मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्या वतीने २४ एप्रिल २०२६ शुक्रवार रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीलाताई  मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा चंपावती रत्न व मातृभूमी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांना देखील राज्यस्तरीय मातृभूमी समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परंतु कार्यक्रमातून काही कारणास्तव त्यांना लिंबागणेशला जावे लागल्याने त्यांचा  सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन स्थळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय मातृभूमी समाजरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डी.जी.तांदळे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, शिवाजी कोण होता? हे पुस्तक व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय तांदळे, प्रवीणकुमार पालीमकर, डॉ. लक्ष्मण पवळ, शेख युनूस चऱ्हाटकर, रामनाथ खोड, गणेश मस्के, माजी सैनिक अशोक येडे, सय्यद सादेक, रामधन जमाले, शेख मुबीन, बाजीराव ढाकणे, अशोक ढोले, शिवाजी हिंदोळे आदींसह सामाजिक  कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Back to top button