बीड

पर्यावरण संवर्धनासाठी ई-बाईक – प्रा.राळेभात

पर्यावरण संवर्धनासाठी ई-बाईक – प्रा.राळेभात

ईमिक ई-बाईक शोरूमचा भव्य शुभारंभ

जामखेड : शहरात पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणाऱ्या ‘ईमिक ई-बाईक’ या नूतन शोरूमचा भव्य शुभारंभ शनिवारी (दि. १८ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता खर्डा रोडवरील लक्ष्मी चौक येथील टाइम कॉम्प्लेक्समध्ये, नाजिराबानो हॉस्पिटलसमोर उत्साहात पार पडला. या शोरूमचे उद्घाटन जेष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रा. राळेभात यांनी वाढते प्रदूषण आणि इंधन दर लक्षात घेता ई-बाईक हा पर्यावरणपूरक व किफायतशीर पर्याय असल्याचे सांगितले. शहरात अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संपत राळेभात, गजानन शिंदे, औदुंबर शिंदे, संतोष शिंदे, नागेश खरसाडे, संदीप शिंदे, डाॅ. तानाजी राळेभात,संग्राम राळेभात,डॉ. पांडुरंग नेटके, महेश शिंदे, ज्ञानेश्वर खेडकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.

या शोरूमच्या माध्यमातून जामखेडकरांना आधुनिक, कमी खर्चिक व प्रदूषणमुक्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचे आयोजन प्रा. वैभव औदुंबर शिंदे यांनी केले

Back to top button